Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेनेच्या माजी नगरसेविकेच्या पतीवर हल्ला; राजकीय वादातून हल्ला झाल्याची चर्चा

इस्लामपूर / प्रतिनिधी : येथील शिवसेनेच्या माजी नगरसेविका प्रतिभा शिंदे यांचे पती शिवकुमार शिंदे यांना सोमवारी सकाळी अज्ञात पाच ते सहा जणांनी काठ्

लाडक्या शेवंताचा क्लासी अवतार | फिल्मी मसाला | LokNews24 |
विरोधकांच्या भूलथापांना आता जनता फसणार नाही : निशिकांत भोसले-पाटील
खंडाळ्याच्या ब्रिलियंट इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विद्यार्थी दिन साजरा

इस्लामपूर / प्रतिनिधी : येथील शिवसेनेच्या माजी नगरसेविका प्रतिभा शिंदे यांचे पती शिवकुमार शिंदे यांना सोमवारी सकाळी अज्ञात पाच ते सहा जणांनी काठ्या व लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये त्यांच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजकीय वादातून मारहाण झाल्याची चर्चा सर्वत्र पसरली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवार, दि. 25 रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास येथील हनुमाननगरमध्ये शिंदे यांच्या घरासमोर मारहाणीची घटना घडली आहे. मोटार सायकलवरुन आलेल्या पाच-सहा जणांनी शिवकुमार शिंदे यांना मारहाण केली. या सर्वांनी तोंड बांधलेले होते. या घटनेनंतर परिसरातील लोकांनी जखमी शिंदे यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी सांगली येथे नेण्यात आले.
शिवकुमार शिंदे हे शिवसेनेच्या माजी नगरसेविका प्रतिभा शिंदे यांचे पती आहेत. प्रभाग 4 मधून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार व प्रतिभा शिंदे या निवडून आल्या होत्या. सभागृहाचा कार्यकाल संपत आल्यानंतर शहराचे इश्‍वरपूर असे नामकरण करण्याची मागणी शिवसेनेने केली होती. या नामांतरणाचा ठराव घेण्यासाठी बोलविलेल्या पालिकेच्या सभेस नगरसेविका शिंदे या गैरहजर होत्या. तेंव्हापासून त्यांचे शिवसेनेशी बिनसल्याची चर्चा होती. प्रतिभा शिंदे या सेनेच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी आहेत. त्यांच्या पतींना मारहाण झाल्याच्या घटनेने इस्लामपूर शहरात एक खळखळ उडाली आहे.

COMMENTS