Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार गायकवाडवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

ठाणे ः भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी जागेच्या वादातून पोलिस स्टेशनमध्येच शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर गोळीबार केल्याची घटना समोर आली होती. त्य

संगमनेरमध्ये मनोरुग्ण महिलेवर अत्याचार
मोदी मंत्रिमंडळाचा चेहरा बहुजन !
शंभर दिवसांच्या अजेंड्यावरील कामासाठी सज्ज व्हा

ठाणे ः भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी जागेच्या वादातून पोलिस स्टेशनमध्येच शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर गोळीबार केल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर पोलिसांनी गायकवाड याला अटक केली आहे. मात्र गायकवाड याच्यावर रविवारी अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा शेतकर्‍यांनी दाखल केला आहे. आमदार गणपत गायकवाड यांच्यासह आठ जणांविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.
आमदार गणपत गायकवाड यांनी 31 जानेवारी रोजी दुपारी 1.00 वाजेता जातीवाचक शिविगाळ केली, असा आरोपी शेतकर्‍यांनी केला. त्यामुळे त्यांच्यासह जितेंद्र पारीक, विठ्ठल चिकणकर, शिवाजी फुलोरे, सौरभ सिंग, छोटू खान, चंद्रकांत ओल, नगेश वारघेट यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. नीता एकनाथ जाधव यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 31 जानेवारी रोजी गणपत गायकवाड आणि इतरांनी आमच्या जागेवर कंपाउंड करण्याचे काम सुरु केले. आम्ही त्यांना जाब विचारला तेव्हा आमदार गणपत गायकवाड यांनी आम्हास मारण्यासाठी फावड्याचा दांडका उचलला. त्यानंतर जातीवाचक शिविगाळ केली. तुम्ही तुमच्या जमिनीकरीता कोणत्याही कोर्टामध्ये जा, आम्ही ते घेऊ, अशी धमकी गायकवाड याने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

COMMENTS