Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महानाट्यातून अटलजींचा जीवनपट जगासमोर येणार

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

नागपूर : ‘राष्ट्रपुरुष अटल’ या महानाट्यातून माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या महान कर्तृत्व,नेतृत्वाचा आणि समर्पित देशसेवेचा संदेश जग

लोकसभा निवडणूक 16 एप्रिलला होणार ?
चांदोली धरणातून 3800 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंगांनी सुचविले मोदींना पाच उपाय

नागपूर : ‘राष्ट्रपुरुष अटल’ या महानाट्यातून माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या महान कर्तृत्व,नेतृत्वाचा आणि समर्पित देशसेवेचा संदेश जगासमोर येणार, असा विश्‍वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नागपुरात व्यक्त केला.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने नागपुरातील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात माजी प्रधानमंत्री अटलबिहारी  वाजपेयी यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणार्‍या ‘राष्ट्रपुरुष अटल’ या महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार सर्वश्री हरिभाऊ बागडे, प्रवीण दटके, प्रवीण दरेकर, आशिष शेलार,सुभाष देशमुख,सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सचिव सौरभ विजय आदी मान्यवर  उपस्थित होते. पाटील म्हणाले, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित या महानाट्याचा प्रयोग ही अटलजींच्या बहुआयामी व्यक्तीमत्वाचा परिचय देणारी कलाकृती ठरावी असेच यातील पात्र व रचनेचे अवलोकन करताना प्रतित होते. नुकतेच 25 डिसेंबर रोजी अटलजींचा जन्मदिन साजरा झाला. याचेच औचित्य साधून सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कल्पनेतून आज या महानाट्याचे सादरीकरण होत असल्याचे समाधान आहे. या महानाट्याच्या माध्यमातून अटलजींचे देशसेवेसाठी समर्पित जीवन, त्यांनी देशाला दिलेले नेतृत्व, त्यांच्या कविमनाचा परिचय जनतेला होईल अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. 

COMMENTS