आता फुले- आंबेडकर येणार नाहीत

Homeताज्या बातम्यासंपादकीय

आता फुले- आंबेडकर येणार नाहीत

भारतात एकेकाळी जागतिक दर्जाचे शिक्षण देणारे विश्वविद्यालये होते. प्राचीन काळात तक्षशिला, नालंदा हे विश्व विद्यालये जगप्रसिद्ध असल्यामुळे जगभरातूत या

एसटी संपाचा बागुलबुवा
लग्नाळूंचा मोर्चा आणि वास्तव
तपासयंत्रणांचे छापे

भारतात एकेकाळी जागतिक दर्जाचे शिक्षण देणारे विश्वविद्यालये होते. प्राचीन काळात तक्षशिला, नालंदा हे विश्व विद्यालये जगप्रसिद्ध असल्यामुळे जगभरातूत या विश्व विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी विध्यार्थी येत असत. या दोन्ही विश्व विद्यालयाने जगाच्या ज्ञान- विज्ञान- तंत्रज्ञान क्षेत्राची उंची वाढवून मानवी विकास साध्य करण्यासाठी असामान्य कामगिरी केली. भारतात जेव्हा वैदिक धर्माचा शिरकाव झाला तेव्हा नीती विरुद्ध अनीती असा संघर्ष भारतात झाला.  हे बुद्धकालीन विश्वविद्यालये आणि नीतिमान बुद्ध संस्कृतीचा या वैदिकांनी छळ केला. बुद्ध धम्माचे प्रचारक भिक्षु यांच्या वैदीक धर्मवाद्यांकडून हत्या झाल्या. याचा परिणाम असा झाला की, भारतातून भिक्कू लोकांनी पलायन केले. ते विदेशात गेले. आणि अखेर भारताच्या शांततेला तसेच समता, स्वतंत्र, बंधुता या मूल्याला घरघर लागली. या वैदीक धर्मवाद्यांनी भारतात येऊन इथली बंधू भावाची संस्कृती उध्वस्त करून भेदभावाचे विष पेरले. आपापसातल्या या भेदभावामुळे आपल्या देशावर परकीयांनी राज्य केले. या परकीयांच्या कार्यकाळात हे वैदिक धर्मवादी त्यांच्यासोबत युती करून राहिले खरे पण परकीयांबरोबर खरा संघर्ष केला तो स्वदेशी नागरिकांनीच. भारतातील सर्वतऱ्हेची सुव्यवस्था लयास जाण्यास सर्वप्रथम कोणी कारणीभूत असतील तर ते विषमतावादाचे पुरस्कर्ते. या विषमतावादी विचारसरणीच्या लोकांनी पुढे सामान्य जनतेला शिक्षणाचा अधिकार नाकारला. त्यांना गुलाम केले. आणि हजारो वर्ष त्यांच्यावर अन्याय करणारे कायदे लादून त्याचा अनोनात छळ केला. याच विचारसरणीच्या लोकांनी इथे वर्णव्यवस्थेचे स्थापना करून जातीची निर्मिती केली आणि स्वतः या वर्ण व्यवस्थेत अग्रस्थानी राहिले. ही अन्याय कारक वर्ण आधारित कायद्याची चौकट मोडण्यासाठी या देशात अनेक संत, महापुरुष यांनी प्रबोधन करून सामान्य लोकांना स्वतंत्र करण्यासाठी काम केले आहे. यामध्ये संत तुकाराम, जनाबाई, गाडगे बाबा, तुकडोजी महाराज यांनी प्रबोधनातून लोकांमध्ये जागृती केली. पुढे महात्मा जोतीराव फुले यांनी सर्वाना शिक्षणाचे दरवाजे खुले करण्यासाठी कार्य केले. महात्मा फुले यांनी या वर्णव्यवस्थेचे सर्व नियम लाथाडून या देशात मोठी क्रांती केली. मुलींची पहिली शाळा काढून फुले दाम्पत्यांनी केलेली क्रांती या वैदीक लोकांच्या डोळ्यात सलत होती. त्यांनी क्रांती जोती सावित्रीबाई फुले यांचा छळ केला. धर्माच्या विरोधात वर्तन करणाऱ्या जोतीरावांच्या वडिलांकडे त्यांची तक्रार केली. पण जोतीराव या विचारसरणीला मूठमाती देत आपले कार्य करत राहिले. महात्मा फुले यांची शिक्षण क्रांती खऱ्या अर्थाने नीतीने जगण्याचे सामर्थ्य अंगी यावे म्हणून होती. बुद्ध कालीन कालखंडात सर्वांसाठी शिक्षण खुले होते आणि तेव्हा समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता या मूल्याचा प्रभाव अधिक होता. फुलेंनी शिक्षणाचे दरवाजे सर्वांसाठी खुले केल्यामुळे खऱ्या अर्थाने तक्षशिला, नालंदा विश्व विद्यालयाची पुनर्स्थापना या देशात केली. पुढे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या वैदीक संस्कृतीचा नायनाट करण्यासाठी आणि खरी लोकशाही या देशात निर्माण होण्यासाठी लढा निर्माण केला. माणसाला माणसाप्रमाणे जगता यावे यासाठी त्यांचा लढा होता. हा लढा मानवतावादी होता. मानव हा या लढ्याचा केंद्रबिंदू असल्यामुळे तो या गुलामीतून मुक्त करण्यासाठी बाबासाहेबांच्या लढ्याला यश आले आणि हजारो वर्ष गुलामीत जगणारा समुदाय बाबासाहेबानी मुक्त केला. आज भारतात जी संसदीय लोकशाही नांदत आहे ती बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक समामुळेच. पण बाबासाहेब यांनी सर्वसामान्यांसाठी निर्माण केलेल्या संसदीय लोकशाहीत सत्तेच्या दोऱ्या कुणाच्या हाती आहेत? आणि याला जबाबदार कोण आहे? गुलामाला गुलामीतून बाहेर काढण्यासाठी आपल्या महामानवांनी आयुष्यभर संघर्ष केला. मताचा अधिकार दिला. आपल्या लोक या मताच्या अधिकाराचा सौदा करत असल्यामुळे व्यवस्था जगाच्या पोशिंद्यावर गोळीबार करते हे आपण लखीमपूर प्रकरणी पाहिले आहे. पण आपल्या भारतीय लोकांच्या मस्तकातील गुलामी आज निघालेली आहे काय? की, ही गुलामी नेणिवेतच ठासून भरलेली आहे? या गुलामी करण्याच्या सवयीमुळे आज देशात वंचित समूह आजही सत्तेच्या बाहेर आहे. या वंचितांचे वर्तमान सुधारण्यासाठी वंचित समूहाने आपला मेंदू पाझळून घ्यावा आणि सद्सद विवेक बुद्धीने विचार करून सावध व्हावे. कारण येणाऱ्या भयानक गुलामीतून तुम्हाला वाचवण्यासाठी आता फुले- आंबेडकर येणार नाहीत.  

COMMENTS