आता खाजगी कंपन्यांवरही अदानी गृपची वक्र नजर !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

आता खाजगी कंपन्यांवरही अदानी गृपची वक्र नजर !

 भारतीय बाजारपेठेत सिमेंट उद्योगामध्ये प्रचंड दबदबा असलेल्या एसीसी आणि अंबुजा सिमेंट या ग्रुप कंपनीची मालकी असणाऱ्या होल्कीम ग्रुप ने भारतातून आपला व

विद्यार्थ्यांनो, भीती न बाळगता आव्हान स्वीकारा तरच यशस्वी व्हाल- जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे
Beed : केवळ 2 मिनटं 33 सेकंदामध्ये “या” रुग्णालयातून दुचाकी लंपास | LokNews24
मुंबईच्या गोरेगाव फिल्मसिटीमध्ये टीव्ही मालिकेच्या सेटला भीषण आग

 भारतीय बाजारपेठेत सिमेंट उद्योगामध्ये प्रचंड दबदबा असलेल्या एसीसी आणि अंबुजा सिमेंट या ग्रुप कंपनीची मालकी असणाऱ्या होल्कीम ग्रुप ने भारतातून आपला व्यवसाय विक्री करण्याचे धोरण ठरवले आहे. त्यांच्या व्यवसाय विक्रीच्या या निर्णयाने भांडवली जगात प्रचंड खळबळ माजली आहे. तसे पाहता हॉल किंग ग्रुपने भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहण्याचा दबदबा निर्माण केला आहे. मात्र हा धबधबा त्यांनी दोन कंपन्या निर्माण करून केलेला आहे. एसएससी सिमेंट आणि अंबुजा सिमेंट या दोन्ही कंपन्या एकाच कंपनीच्या मालकीचे आहेत आणि ती कंपनी म्हणजे होल्कीम ग्रुप. होल्किम या कंपनीने आता या लाफर्ज कंपनीबरोबर विलीनीकरण केलेले. जागतिकीकरणामुळे कंपनीचे भांडवली ताकद अजून वाढली असताना अचानक आपला व्यवसाय विक्रीचा घेतलेला निर्णय हा उद्योग  जगताला थक्क करणारा आहे. कारण कोणतीही कंपनी आपला व्यवसाय विक्रीचा निर्णय त्याच वेळी घेते, जेव्हा भांडवली बाजारात त्या कंपनीला अडचण निर्माण होते किंवा त्या त्या देशातील शासकीय धोरण जर बदलली तर अशा वेळीही ब-याच कंपन्या व्यवसाय विक्रीचा किंवा बंद करण्याचा निर्णय घेतात. सध्या सिमेंट उद्योगाविषयी केंद्र शासनाचे फार वेगळे धुणं असे मला आलेले नसले तरीही ज्या कंपन्यांची होल्किम ग्रुप चर्चा करते आहे, असे भासवले जात आहे. परंतु आतील सूत्रानुसार वस्तुस्थिती काहीशी वेगळी आहे. आता देशातील केवळ सरकारी उद्योगांवरंच अदानी – अंबानी ग्रुपची वक्र नजर पडली नसून – बहुराष्ट्रीय कंपन्यांवर – ज्या खाजगी आहेत त्यांच्यावरही आता या ग्रुपने आपली वक्र नजर फिरवली आहे. हे ग्रुप वर्तमान केंद्र सरकारचे निवडणुकीतील रसददार असल्यामुळे त्यांच्या बेताने धोरणे बनविणे किंवा दबाव निर्माण करणे असा प्रकार आता भांडवली जगालाही नवा नाही. देशात इन्फ्रास्ट्रक्चर किंवा संरचनात्मक धाचा निर्माण करणारी कामे मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे सिमेंट उद्योगाची प्रचंड गरज आहे. अदानी – अंबानी या दोन्ही ग्रुप चे वैशिष्ट्य असेल की यांनी आजपर्यंत उत्पादनात किंवा भांडवली बाजारात कोणतीही कल्पकता न दाखवता केवळ निवडणुकीच्या काळात भविष्यात सत्तेत येणाऱ्या राजकीय पक्षांना देणग्या देण्याच्या स्वरूपातून त्यांचे सरकारांशी हितसंबंध निर्माण होतात. अशा प्रकारचे हितसंबंध केवळ वर्तमान भाजप सरकार बरोबरच आहेत, असेही नाही. यापूर्वी काँग्रेसचे गुजरातमधील एका दिवंगत नेत्याच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाशीही यातील ग्रुप हे बरच काही मिळविण्याचा प्रयत्न करीत असत. परंतु आज तर सत्ताधारी हे, या ग्रुपचे प्रचंड पाठीराखे असल्याने जागतिक भांडवली बाजारात त्यांचा दबदबा निर्माण करण्यासाठी प्रसंगी अप्रत्यक्षरीत्या केंद्र सरकार प्रयत्न करीत असल्याच्या, अनेक बाबी यापूर्वीही चर्चिल्या गेलेल्या आहेत. एसएससी आणि अंबुजा सिमेंट या दोन्ही कंपन्या प्रामुख्याने हॉल्किम या स्विझर्लंडस्थित असलेल्या कंपनीच्या मालकीच्या आहेत. सिमेंट उद्योगाला असणारी मागणी, सहज होणारा खप आणि इन्फ्रास्ट्रक्चर चे मोठ्या प्रमाणात सुरू असलेली कामे यामुळे कोणतीही कल्पकता न वापरता सिमेंट उद्योगाचे मार्केट काबीज करण्यासाठी अदानी ग्रुप पुढे सरसावला आहे. मात्र, बऱ्याच वेळा या ग्रुपला जेव्हा एखादी कंपनी विकत घ्यायची असते तेव्हा इतर कंपन्यांसोबतही चर्चा चालू असल्याचे भासवले जाते; परंतु, प्रत्यक्षात मात्र वस्तुस्थिती विपरीत असते. होल्किम या या कंपनीच्या माध्यमातून एसीसी सिमेंट आणि अंबुजा सिमेंट या दोन्ही कंपन्या उभारण्यासाठी जवळपास त्यांना १७ वर्षांपेक्षा अधिक कालावधी पूर्ण झाला आहे. आता हे उद्योग पूर्णपणे स्थिर झाल्यानंतर या कंपन्यांवर दबाव आणणारी रणनीती तयार झाल्यामुळेच त्या भारतातून उद्योग विकण्याच्या निर्णयापर्यंत आलेले आहे. याचा दुसरा अर्थ असा की केवळ सरकारी कंपन्याच नव्हे, तर, खाजगी क्षेत्रातील प्रचंड मागणी असणाऱ्या उद्योगांवरही आता अदानी – अंबानी ग्रुपच्या वक्र नजरा पडल्या आहेत. ही वस्तुस्थिती यातून पुढे येऊ पाहत आहे.

COMMENTS