Homeताज्या बातम्या

मुदत संपल्याने सातारा झेडपीची धुरा सांभाळणार सीईओ

सातारा / प्रतिनिधी : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची मुदत संपत आल्याने पुढील चार महिन्यांसाठी प्रशासक नेमल्याचे आदेश आज राज्य शासनाने दिले आहेत. त

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या मुलाविरोधात बलात्काराची तक्रार
जात स्पष्ट करणारी आडनावे बदला…
उक्कडगावमध्ये मुंजोबा विद्यालयाच्या प्रवेशद्वाराचे लोकार्पण

सातारा / प्रतिनिधी : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची मुदत संपत आल्याने पुढील चार महिन्यांसाठी प्रशासक नेमल्याचे आदेश आज राज्य शासनाने दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेची सर्व सूत्रे 21 मार्चपासून मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा व जिल्ह्यातील 11 पंचायत समितींची सूत्रे उद्यापासून (सोमवार) गटविकास अधिकार्‍यांच्या हाती जाणार आहेत.
कोरोनाची तिसरी लाट, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला दिलेली स्थगिती आदींमुळे निवडणुका वेळेत होणार, की लांबणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने महापालिका, नगरपालिकांच्या वॉर्डाची हद्दवाढ केली. तसेच ग्रामीण भागातही मतदारसंख्या वाढल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती गट, गणांची फेररचना करावी, हद्दवाढ करावी, अशी मागणी करण्यात येत होती. याचबरोबर ओबीसींचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे मोठा पेच निर्माण झाला. त्यातून ओबीसींना राजकीय आरक्षण पुन्हा मिळत नाही. तोपर्यंत निवडणुका न घेण्याची सर्वच राजकीय पक्षांनी भूमिका घेतल्याने यंदा निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. अखेर आज राज्य शासनाने अध्यादेश काढून निवडणुका किमान चार महिने तरी घेणे शक्य नसल्याने आता जिल्हा परिषदेवर मुख्य कार्यकारी अधिकारी, तर पंचायत समित्यांवर गटविकास अधिकार्‍यांनी नियुक्ती करण्याचे नेमण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, सातारा जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांचा कार्यकाल 20 मार्चला संपत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची 21 मार्चपासून मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्याकडे प्रशासकपदाची जबाबदारी येणार आहे. पंचायत समितीचे पदाधिकारी व सदस्यांचा कार्यकाल आज संपत असून, 14 मार्चपासून गटविकास अधिकारी प्रशासक म्हणून काम पाहणार आहेत.
विनय गौडा दुसर्‍यांदा प्रशासकपदी
सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा हे नंदुरबार जिल्हा परिषदेचे सीईओ असताना 2019-20 मध्ये प्रशासकपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर आता दुसर्‍यांदा ते सातारा जिल्हा परिषदेच्या प्रशासकपदाची सूत्रे हाती घेणार आहेत.

COMMENTS