Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखेर बंडखोरांच्या तलवारी म्यान

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर आता सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. या दिवशी अनेक बंड

पंकजा मुंडेंनी काँग्रेस प्रवेशाच्या चर्चांना दिला पूर्णविराम
नोकरीचे अमिष दाखवून तरुणीवर अत्याचार .
नगरचे रस्ते विकासाला डांबर दरवाढीची खीळ
महाराष्ट्रासह 4 राज्यात विधानसभा निवडणुक कधी? आयोगाने दिल्या राज्यांना  महत्वाचा सूचना - Marathi News | When will the assembly elections in 4  states including maharashtra the ...

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर आता सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. या दिवशी अनेक बंडखोरांनी आपल्या तलवारी म्यान केल्याचे दिसून आले. त्यामुळे महाविकास आघाडी विरूद्ध महायुती असा थेट सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करणारे मनोज जरांगे देखील आपल्या उमेदवारांना पाठिंबा देणार होते. मात्र त्यांनी माघार घेतल्यामुळे राजकीय चित्र काल स्पष्ट झाले.
महायुतीच्या अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, यामध्ये गोपाळ शेट्टी- भाजप, बोरीवली, विश्‍वजीत गायकवाड, भाजप, लातूर, विजयराज शिंदे- भाजप, बुलढाणा, किशोर समुद्रे- भाजप, मध्य नागपूर, अमित घोडा- भाजप, पालघर, स्वीकृती शर्मा- शिवसेना शिंदे गट अंधेरी पूर्व, जगदीश धोडी- शिवसेना शिंदे गट, बोईसर, प्रशांत लोखंडे- शिवसेना शिंदे गट, श्रीरामपूर, नाना काटे- अजित पवार, चिंचवड यांचा समावेश आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून बाबुराव माने- शिवसेना ठाकरे गट, धारावी, सुहास नाईक-काँग्रेस शहादा तळोदा, विश्‍वनाथ वळवी- काँग्रेस, नंदुरबार, मदन भरगड- काँग्रेस, अकोला, तानाजी वनवे- काँग्रेस, नागपूर पूर्व, मधू चव्हाण- काँग्रेस, भायखळा यांचा समावेश आहे. अर्ज माघारीसाठी अवघ्या काही मिनिटांचा कालावधी बाकी असताना मधुरिमाराजे यांनीच कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. मधुरिमाराजे यांना नाईलाजाने माघार घ्यावी लागली. सोलापूर दक्षिण मतदारसंघात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. सोलापूर दक्षिणमध्ये दिलीप माने हेच काँग्रेसचे उमेदवार असतील असे सांगून देखील काँग्रेसने त्यांना एबी फॉर्म दिला नाही. त्यामुळे, दिलीप मानेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, अर्ज भरण्याच्या शेवटच्यादिवशी दिलीप माने व त्यांच्या मुलाने अर्ज माघारी घेतले आहेत.

सदा सरवणकर निवडणूक लढणार
सदा सरवणकर यांनी सोमवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेण्यास सांगितले होते. त्यानुसार सदा सरवणकर यांचे सुपुत्र समाधान सरवणकर आणि सहकारी राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी शिवतीर्थावर गेले होते. मात्र, राज ठाकरे यांनी त्यांची भेट घेण्यास नकार दिला. त्यामुळे सदा सरवणकर यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

COMMENTS