Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बहिरवाडीत झाडे लावून अस्थी व रक्षा विसर्जन

अकोले ः आपल्या घरातील गेलेल्या व्यक्तिच्या रक्षा व अस्थि तिर्थक्षेत्री  किंवा नदीत विसर्जन न करता त्या व्यक्तीने आयुष्यभर कष्ट केलेल्या शेतात टाक

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात धडकला मोर्चा
लिंबागणेश बसस्थानकावर स्कारपियो आणि बोलेरो मध्ये विचित्र अपघात LokNews24
मैदानी खेळांना प्रोत्साहन देण्याची गरज ः विवेक कोल्हे

अकोले ः आपल्या घरातील गेलेल्या व्यक्तिच्या रक्षा व अस्थि तिर्थक्षेत्री  किंवा नदीत विसर्जन न करता त्या व्यक्तीने आयुष्यभर कष्ट केलेल्या शेतात टाकून त्यावर वृक्षारोपण करणे म्हणजे त्या व्यक्तीबरोबर निसर्गाप्रती  देखील कृतज्ञता व्यक्त करणे होय. हा आदर्श चासकर परिवाराने जपला आहे. दूधगंगा पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन तथा अकोले तालुका माजी सभापती व अकोला तालुका एज्युकेशन सोसायटी माजी अध्यक्ष व अकोले तालुक्याच्या राजकारणात सक्रिय असलेले विठ्ठलराव शंकर चासकर यांचे वयाच्या 72 व्या वर्षी  निधन झाले.
रक्षा विसर्जन नदीमध्ये करण्याऐवजी त्यांच्या शेतात विसर्जित करून त्यावर केशर आंब्याचे रोप, व वटवृक्ष लावण्यात आले. चासकर परिवाराने यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करून सामाजिक संदेश देणारा उपक्रम केला.त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ एक पर्यावरण पुरक उपक्रम चासकर कुटुंबीयांमार्फत राबविण्यात आला.एक नविन आदर्श ठेवण्यात आला. कै. विठ्ठलराव शंकर चासकर, हे चळवळीतले नेते होते. माजी मंत्री मधुकर रावजी पिचड यांच्या काळात सभापती पदी विराजमान होऊन तालुक्याची धुरा सांभाळली. तसेच अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीमध्ये शिक्षणाच्या बाबतीत मोठे निर्णय घेतले त्याचप्रमाणे तालुका फेडरेशनचे  अध्यक्ष म्हणून सर्व गाव भाऊबंद व नातेवाईक यांच्याशी मोठा जनसंपर्क त्यांचा होता.ते अजातशत्रू होते. वृक्षारोपणाच्या माध्यमातून पिढ्यान् पिढ्या आपल्या जिवलग व्यक्तीच्या स्मृती जपल्या जातात. पाणी आणि हवा जीवनाच्या अत्यावश्यक गरजा आहेत व माणूस यांची नासाडी करत आहे. हा निसर्ग विनामोबदला आपल्या सर्वांना अविरतपणे ऑक्सीजन पुरवण्याचं काम करतो आहे. या माध्यमातून हा निसर्ग संवर्धन करण्याचा हा एक प्रयत्न आहे. संपूर्ण मानव जातीने पाणी व हवा यांचे प्रदूषण रोखण्यासाठी कृतीयुक्त  प्रयत्न करणे गरजेचे आहे. या एकाच कृतीने नदीचे पाणी दुषित होणार  नाही व एक झाड कायम स्वरुपी मातृ पितृ स्मृती म्हणून जपले जाते.या दुहेरी भावनेने वृक्षारोपण करून आपण त्या निसर्गाप्रती व आपल्या घरातील गेलेल्या माणसाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे याप्रसंगी त्यांचे चिरंजीव सचिन चासकर, डॉक्टर नितीन चासकर,पत्नी हेमलता चासकर, बिपिन चासकर, बंधू  सुभाष सासकर, दशरथ चासकर, शांताराम चासकर, गौराम चासकर यांसह त्यांचे नातवंडे, सुना, बहीण पुतणे सर्व परिवार उपस्थित होता.

COMMENTS