Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सहायक पोलिस आयुक्ताची पत्नी आणि पुतण्यासह आत्महत्या

पुणे/प्रतिनिधी ः अमरावती पोलिस दलातील सहायक पोलिस आयुक्त भरत गायकवाड यांनी पत्नीचा आणि पुतण्याचा गोळी झाडून खून केला. त्यानंतर त्यांनी स्वतःवरही

गांजाचे व्यसन लावल्याने तरुणीची आत्महत्या
सैन्य भरतीच्या अमिषाने फसवणूक
बीडच्या विद्यार्थ्याची पुण्यात आत्महत्या

पुणे/प्रतिनिधी ः अमरावती पोलिस दलातील सहायक पोलिस आयुक्त भरत गायकवाड यांनी पत्नीचा आणि पुतण्याचा गोळी झाडून खून केला. त्यानंतर त्यांनी स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील बाणेर परिसरात पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
गायकवाड यांनी एवढे टोकाचे पाऊल का उचलले? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण या घटनेमुळे राज्याच्या पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, पुण्यातील बाणेर, बालेवाडी भागात गायकवाड कुटुंब वास्तव्यास होते. हे एक सुखवस्तू कुटुंब होते. पोलिस दलात वरिष्ठ पदावर कार्यरत असणारे भरत गायकवाड शनिवारीच अमरावतीहून पुण्याला आले होते. त्यांनी सोमवारी पहाटे प्रथम पत्नी मोनी गायकवाड व पुतण्या दीपक गायकवाड यांची गोळ्या घालून हत्या केली. त्यानंतर त्यांनी स्वतःवर गोळी घालून आत्महत्या केली. पोलिसांच्या माहितीनुसार, गोळीबार करण्यापूर्वी गायकवाड यांनी आपली आई व मुलांना दुसर्‍या खोलीत पाठवले. त्यानंतर त्यांनी पत्नीला गोळी घातली. त्यानंतर गोळीबाराचा आवाज ऐकूण पुतण्या दीपक गायकवाड याने घटनास्थळी धाव घेतली असता गायकवाड यांनी त्याच्यावरही गोळी झाडली. त्यात पुतण्याही जागीच खाली कोसळला. या घटनेमुळे घाबरलेल्या मुलांनी या घटनेची माहिती फोनद्वारे पोलिसांना दिली. त्यांनी तातडीने तिघांनाही रुग्णालयात हलवले. तिथे डॉक्टरांनी तिघांचाही मृत्यू झाल्याची घोषणा केली. पोलिसांना घटनास्थळी कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. पण घटनेमागील कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिस तपासाची वेगवान चक्रे फिरवत आहेत.

COMMENTS