Homeताज्या बातम्यासंपादकीय

विधानसभा निवडणूका दृष्टीपथात!

केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र दौरा सध्या सुरू झाला आहे. तीन दिवसीय या दौऱ्यानंतर बहुधा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा होणे अपेक्

उदयनराजेंचे आंदोलन श्रेयासाठी ? 
विवेकाचा नंदादीप पेटत राहो !
महाभारत ते एकविसावे शतकाचे चक्रव्यूह !

केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र दौरा सध्या सुरू झाला आहे. तीन दिवसीय या दौऱ्यानंतर बहुधा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा होणे अपेक्षित आहे. अर्थात, २० नोव्हेंबर पूर्वी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पूर्ण होतील, असा आता सर्वांचाच कयास आहे. निवडणुकीसाठी लागणारे ४५ दिवसांचे शेड्युल पाहिलं तर, साधारणपणे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातच किंवा एक दोन तारखेलाच निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी पुणे मेट्रो आणि मुंबई मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होतील.  या उद्घाटनानंतरच बहुधा निवडणुकीची घोषणा होईल; अर्थात, महाराष्ट्रामध्ये कुठल्याही परिस्थितीत निवडणुका जिंकायच्याच असा निर्धार भाजपाचे नेते माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि वर्तमान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र दौऱ्यावर नुकताच केला होता. त्यांच्या त्या वक्तव्यावर विविध समाज माध्यमांवर आणि प्रसारमाध्यमांवर टीकाही झाली. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जिंकणं भारतीय जनता पक्षाला आणि विशेषता केंद्र सरकारला यासाठी महत्त्वाचे आहे की अदानी ग्रुपचे बहुतांश प्रकल्प हे महाराष्ट्र आणि मुंबईत सुरू आहेत. या प्रकल्पांना वेग आणि कुठल्याही अडथळ्यांशिवाय पूर्ण करायचं असेल तर, महायुतीचे सरकार रिपीट झाले पाहिजे किंवा भाजपाला बहुमत मिळाले पाहिजे, असे त्यांचे प्रयत्न असतील; तर, दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी कसून निवडणुकीच्या रिंगणात उतरत असल्याचे दिसते आहे. त्यामुळे ही लढत निश्चितपणे ‘कांटे की टक्कर’, अशीच होईल. त्यामध्ये आता तिसरी आघाडी होऊ घातल्याचा जो कयास एकंदरीत नेत्यांच्या भूमिकेवरून दिसतो आहे;

त्यामध्ये खासकरून राजू शेट्टी, बच्चू कडू आणि ऍड. प्रकाश आंबेडकर या नेत्यांची तिसरी आघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर दलित बुद्धिजीवींनीही राजकीय आघाडीत उडी घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. तशी आघाडी त्यांनी केलीच तर, त्यांचा पहिला प्रयत्न महाविकास आघाडीत सामील होणं हाच राहील. त्यासाठी आपल्याला काही प्रमाणात जागा मिळाव्यात अशी बार्गेनिंग त्यांच्याकडून करण्यात येईल. महाविकास आघाडीच्या तीन पक्षांच्या अंतर्गत आणि त्यामध्ये सपा, शेकाप, माकप आणि भाकप या पूर्वापर आघाडी चे घटक असलेल्या पक्षांना काही जागा सोडण्यात येतील. परंतु, या व्यतिरिक्त इतर कोणत्याही पक्षाला जागा सोडल्या जातील, अशी मात्र सुतराम शक्यता दिसत नाही. याचा अर्थ, महाराष्ट्रातील निवडणुका या महविकास आघाडी सोबत दलित बुद्धिजीवी जातील अशीच अधिक शक्यता आहे. त्यामुळे तिरंगी या लढती होतील. परंतु, ऐनवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जर निर्धार पक्का ठेवलाच, तर, तेही या रिंगणात उतरले तर चौरंगी लढती होतील. या लढतींमध्ये अनेक छोटे-मोठे पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभेचे निकाल पाहिले तर विधानसभेला कमीत कमी उमेदवारांची टक्कर असावी, असा प्रयत्न सत्ताधारी पक्ष ही करतील. जेणेकरून मतांचे विभाजन अधिक होऊ नये. अन्यथा, महाराष्ट्रात किंवा देशात काही जागा लोकसभेच्या अगदी चारशे-पाचशे- हजार अशा फरकांनीही निवडून आलेल्या आहेत. तशी परिस्थिती महाराष्ट्र विधानसभेत निर्माण होऊन १००-२०० मतांनी पराभव पत्करावा लागू नये, यासाठी सत्ताधारी युतीमधील पक्ष, हे अधिक प्रमाणात उमेदवारांची विभागणी न करता, जी मते महायुतीकडे येण्याची शक्यता नाही, अशी मते घेणारे काही पक्ष रिंगणात सोडून, इतर पक्षांना किंवा उमेदवारांना काही प्रलोभन किंवा आमिष देऊन निश्चितपणे बसवण्याचे प्रयत्न करतील, अशी शक्यता मोठी आहे.

COMMENTS