Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रेम व्यक्त करत महिलेशी गैरवर्तन करून चाकूने हल्ला

अहमदनगर/प्रतिनिधी ः माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे, तू मला आवडतेस’ असे म्हणून महिलेसोबत गैरवर्तन करून तिच्यावर चाकू हल्ला केल्याची घटना सावेडी उपनगर

परदेशातून आलेल्या दहाजणांचा शोध सुरू…पाचजण सापडले
 मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेश लोटे यांच्यावर प्राणघातक हल्ला
राष्ट्रवादीला एकहाती सत्ता द्या : आ. आशुतोष काळे

अहमदनगर/प्रतिनिधी ः माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे, तू मला आवडतेस’ असे म्हणून महिलेसोबत गैरवर्तन करून तिच्यावर चाकू हल्ला केल्याची घटना सावेडी उपनगरात घडली. या प्रकरणी पीडित जखमी महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून बबन पालवे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. तपोवन रोड) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबतची माहिती अशी की सावेडी परिसरातील एक विवाहित महिला त्यांच्या किराणा दुकानातून घराच्या कंपाऊंडच्या गेटमधून आत आल्या असता बबन पालवे हा त्यांच्या पाठीमागून घराचे गेटमधून आत आला. तो त्या महिलेस म्हणाला की,‘ माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे, तू मला आवडतेस’, असे म्हणून त्यांच्याशी लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.
या वेळी त्या महिलेने मदतीसाठी आरडाओरडा केला असता त्यांची सासू तेथे आली. त्यांना बबन पालवे याने मारहाण केली. त्यावेळी त्याने त्याच्या हातातील चाकूने महिलेच्या डाव्या हाताच्या पंजावर मारून दुखापत केली. तसेच मी तुमच्या घरातील सर्वांकडे पाहतो, असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात पिडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद केली.

COMMENTS