Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

युवतीवर प्राणघातक हल्ला, आरोपीला पाच वर्ष तुरुंगवास 

नाशिक प्रतिनिधी - लग्नास नकार दिल्याने ओझर येथील युवतीवर कात्रीने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी सागर गायकवाड या आरोपीस निफाड

पंतप्रधान मोदींनी केली 41 हजार कोटींच्या प्रकल्पाची घोषणा
उदय सामंतावरील हल्ला प्रकरणात 6 जणांना पोलीस कोठडी.
काँगे्रसला ‘बळ’ मिळेल का ?

नाशिक प्रतिनिधी – लग्नास नकार दिल्याने ओझर येथील युवतीवर कात्रीने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी सागर गायकवाड या आरोपीस निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश बी. डी. पवार यांनी पाच वर्ष कठोर तुरुंगवासासह ५४ हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. ओझर येथील १८ वर्षाची युवती आणि तिच्या आई-वडिलांनी लग्नास नकार दिल्याचा राग मनात धरून सागर गायकवाडने ही युवती कामावरून घरी जात असताना तिच्यावर शिवण कामाच्या कात्रीने वार करून मारण्याचा प्रयत्न केला. तसेच तिच्यासोबत असलेल्या तक्रारदार महिलेस जखमी केले होते. या प्रकरणी ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या खटल्याची सुनावणी निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. या प्रकरणात न्यायालयाने सागर गायकवाडला दोषी ठरवले.

COMMENTS