Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोमठाणा येथील हानमंत कदम यांच्यावर प्राणघातक हल्ला;आरोपी मोकाट

नांदेड प्रतिनिधी - कुंटूर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील सोमठाणा येथील गरीब शेतकरी हानमंत बळीराम कदम वय 45 वर्ष . धंदा शेती यांना शेजारील मोकळ्या जा

चक्क! गुन्हेगारच रक्ताच्या थारोळ्यात l LokNews24
उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोना पॉझिटिव्ह
ग्राहकांच्या सुविधेसाठी शनिवार व रविवारी वीजबिल भरणा केंद्र सुरु

नांदेड प्रतिनिधी – कुंटूर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील सोमठाणा येथील गरीब शेतकरी हानमंत बळीराम कदम वय 45 वर्ष . धंदा शेती यांना शेजारील मोकळ्या जागेच्या वादावरून त्यांच्याच भावकीतील चार ते पाच जणांनी मिळून प्राण घातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या आशयाच्या फिर्यादीवरून कुंटूर पोलीस स्थानकात दिल्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून यातील दोन ते तीन आरोपी अद्यापही फरार आहेत. ही घटना 25 ऑगस्ट 2023 रोजी घडली.
हानमंत बळीराम कदम यांच्या शेजारी असलेले संतोष किशन कदम वय 23 वर्ष ,तिरुपती केशव कदम वय 25 वर्ष ,सुनिता केशव कदम वय 50 वर्षे. सर्व राहणार सोमठाणा यांनी माझी मोकळी जागा का वापरतो म्हणून हानमंत कदम यांनी विचारले असता, आरोपी संतोष, तिरुपती, सुनीताबाई व होनराव यांनी दगडाने व लाकडाने प्राणघातक हल्ला केला. डोक्यात दगड मारल्याने डोके फुटून रक्त वाहत होते. होनराव बाजीराव कदम, तिरुपती केशव कदम, सुनिता केशव कदम यांनी मला लाकडाने व दगडाने मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यापुढे तू आमच्या नादाला लागशील तर तुला खतम करून टाकू असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. या आशयाची फिर्याद हानमंत बळीराम कदम यांनी गुंटूर पोलिसात दिली असता पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून पुढील औषध उपचारासाठी नायगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी शिफारस केली .नायगाव वैद्यकीय अधिकारी यांनी हानमंत कदम यांना जबर मारहाण असल्यामुळे नांदेड येथील शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथे पाठविण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचारसुरू आहेत. दरम्यान, फिर्याद वापस घे म्हणून पुन्हा विविध प्रकारचा त्रास देणे सुरूच आहे. सदरील वाद गेल्या दहा वर्षापासून सुरू असून कोणत्या न कोणत्या कारणावरून हानमंत कदम यांना त्रास देणे सुरूच आहे. त्यांच्या शेतात पिकाची नासाडी करणे अशा अनेक कारणांमुळे छळवणूक सुरूच आहे.  हानमंत कदम हे एकटे असल्यामुळे आरोपीकङ माणसांचे संख्याबळ जास्त असल्यामुळे त्यांना गाव सोडून जाण्यास मजबूर करीत आहेत.या घडलेल्या घटना प्रकरणी कुंटूर पोलिसांनी आरोपींना मात्र पाहुण्याची वागणूक देत असल्याचा आरोप करण्यात येत असून, आरोपी अद्याप फरार आहेत. त्यामुळे हानमंत कदम यांचे कुटुंब भयभीत झाले असून त्यांनी आपणास न्याय मिळावा म्हणून जिल्हा अधिकार्‍यांसह पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले असल्याचे समजते.

COMMENTS