Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आशियाई चित्रपट महोत्सवाला 12 जानेवारीपासून सुरुवात

मुंबई : आशियाई फिल्म फाऊंडेशनतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदा 12 ते 18 जानेवारी दरम्यान थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी

दे धपाधप! Propose Day ला तरुणांची तुफान हाणामारी | LOKNews24
शहीद जवान उमेश मिसाळ यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
पुण्यात आणखी एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह 7 जणांचे निलंबन

मुंबई : आशियाई फिल्म फाऊंडेशनतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदा 12 ते 18 जानेवारी दरम्यान थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी या महोत्सवाचे 20 वे वर्ष असून या महोत्सवात निवडलेले चित्रपट मुंबईतील माहीम परिसरातील सिटीलाइट सिनेमा आणि कांदिवलीतील ठाकूर महाविद्यालयात दाखवण्यात येणार आहेत. थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात आशियाई विभागात इंडोनेशिया, इजिप्त, नेपाळ, बांगलादेश, मलेशिया आणि श्रीलंका या देशातील 12 चित्रपटांचा समावेश असणार आहे. तर, इराणमधील सात चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. आशियाई चित्रपटांबरोबरच भारतीय चित्रपट आणि मराठी चित्रपटांच्या स्पर्धा यावर्षी महोत्सवाचे आकर्षण असणार आहे.

COMMENTS