बीड प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडी परभणी च्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. दलित अल्पसंख्यांक भटका वि
बीड प्रतिनिधी – वंचित बहुजन आघाडी परभणी च्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
दलित अल्पसंख्यांक भटका विमुक्त व वंचित समूहावर महाराष्ट्रामध्ये राजरोसपणे होणारे अन्याय अत्याचाराचे विरोधामध्ये आज वंचित बहुजन आघाडी परभणी च्या वतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला प्रमुख उपस्थिती मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील वंचित बहुजन आघाडीचे शिस्तपालन समितीचे अध्यक्ष प्रा.विष्णू जाधव सर विभागीय प्रवक्ता डॉ.धर्मराज चव्हाण. जिल्हाध्यक्ष टी डी रुमाले, जिल्हाध्यक्ष सचिन गंगाखेडकर,महिला जिल्हाध्यक्ष सुनीताताई साळवे, युवक जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड, रणजीत मकरंद, लोकसभा उमेदवार आलमगीर खान, बीडचे जिल्हा महासचिव मिलिद घाडगे, पुरुषोत्तम वीर, बालाजी जगतकर, शहराध्यक्ष प्रमोद कुटे, माझी युवक जिल्हाध्यक्ष सुमित भालेराव, अविनाश सावंत,दोन्ही जिल्ह्याचे महासचिव उपाध्यक्ष जिल्हा कार्यकारणी तालुका कार्यकारणी महिला तालुका कार्यकारणी युवक तालुका कार्यकारणी लोक जिल्हा कार्यकारणी अखिल भारतीय बौद्ध महासभा सम्यक विद्यार्थी आंदोलन आदी उपस्थित होते मोर्चाची सुरुवात शनिवार बाजार येथून होऊन मोर्चा गांधी पार्क जिल्हाधिकारी कार्यालय धडकला, उपोषण मैदानावर मोर्चाचे रूपांतर हे जाहीर सभेमध्ये झाले. मोर्चाचे नेतृत्व करणारे अशोक हिंगे साहेब यांनी सभेला संबोधित करताना करताना वरील विचार व्यक्त केले, तसेच येणार्या 20 जुलैला विधानभवनावर गायरान धारकासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लाखोचा मोर्चा करण्यात येणार आहे. या मोर्चासाठी परभणीतून जास्तीत जास्त गायरानधारक वातिक्रमणधारकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले,पुरोगामी महाराष्ट्रामध्ये राजरोसपणे दलित वंचित बहुजन मुस्लिम अल्पसंख्यांक भटके विमुक्त यांच्यावर अत्याचार वाढत आहेत आणि हे सरकार कुंभकर्णच्या झोपेमध्ये झोपलेला आहे. या सरकारला जागे करायचे असेल तर आम्हालाही वेळप्रसंगी संविधानिक मार्गाने आंदोलने करावे लागतील व हे सरकार उलथून लावावे लागेल. शिस्तपालन समितीचे प्रदेशाध्यक्ष तथा प्रभारी विष्णू जाधव सर, विभागीय प्रवक्ता डॉक्टर धर्मराज चव्हाण जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष टीडी रुमाले सुनीताताई साळवे यशवंतजी मकरंद यांचे भाषने झाली, सचिन गंगाखेडकर यांनी आभार मानले कार्यक्रम, यशस्वीतेसाठी जिल्हा कार्यकारणी तालुका कार्यकारणी विद्यार्थी आघाडी युवक आघाडी महिला आघाडी यांनी परिश्रम घेतले.
COMMENTS