कोपरगाव शहर प्रतिनिधी - पत्नीने आपल्या सोबत घरी नांदायला येण्यास नकार दिल्याचा राग मनात घेऊन पतीने आपल्या पत्नीच्या गळ्यावर चाकूने वर करत खून कर
कोपरगाव शहर प्रतिनिधी – पत्नीने आपल्या सोबत घरी नांदायला येण्यास नकार दिल्याचा राग मनात घेऊन पतीने आपल्या पत्नीच्या गळ्यावर चाकूने वर करत खून करण्याचा तसेच स्वतःच्या गळ्यावर देखील चाकूने वार करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे घडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. सविस्तर वृत्त असे की, सुभाष हिरामण सोनवणे राहणार सोयगाव तालुका नांदगाव यांने गुरुवार दि 11 जुलै रोजी रात्री 11.15 वाजण्याच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे राहणारी त्याची पत्नी संगीता हिला आपल्या घरी म्हणजे सोयगाव येथे घेऊन जाण्यासाठी आला असता त्यावेळेस त्याची पत्नी संगीता हिने त्याच्यासोबत घरी जाण्यास नकार दिल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद होऊन आरोपी सुभाष याने त्याची पत्नी संगीता हिला शिवीगाळ व दमदाटी करत तिच्या गळ्यावर चाकूने वार करत तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला तर स्वतःच्या गळ्यावर देखील तिथेच चाकूने वार करत स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना घडली आहे. चासनळी तालुका कोपरगाव येथील रहिवाशी आण्णा वामन बर्डे यांच्या फिर्यादीनुसार कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये आरोपी सुभाष सोनवणे यांच्या विरुद्ध 254/2024 बी.एन.एस 2023 चे कलम 109(1)352,351(2)(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एम ए महाजन हे करत आहे.
COMMENTS