Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लायन्स क्लब कोपरगावच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. मनोज कडू

सचिवपदी डॉ. गलांडे यांची निवड

कोपरगाव शहर ः अत्यंत प्रतिष्ठेच्या असणार्‍या नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या लायन्स क्लब ऑफ कोपरगावच्या अध्यक्षपदी  प्रसिध्द विधितज्ज्ञ अ

BREAKING: नरेंद्र मोदी आणि अमित शाह संविधान बदलण्याच्या तयारीत | Lok News24
कृषीकन्या विशाखा उघडे हिने साधला शेतकऱ्यांशी संवाद
आमदार थोरात व आमदार डॉ.तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात भव्य अश्वारूढ पुतळा साकारणार – सोमेश्वर दिवटे

कोपरगाव शहर ः अत्यंत प्रतिष्ठेच्या असणार्‍या नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या लायन्स क्लब ऑफ कोपरगावच्या अध्यक्षपदी  प्रसिध्द विधितज्ज्ञ अ‍ॅड. मनोज कडू तर सचिवपदी साई ज्योती हॉस्पिटल कोपरगाव येथील प्रसिद्ध मूळव्याध तज्ज्ञ डॉ. तुषार गलांडे यांची तसेच खजिनदारपदी कैलास नागरे यांची नुकतीच सर्वानुमते निवड करण्यात आली आल्याचे क्लबच्या मेम्बरशिप कमिटी चेअरपर्सन बाबा खुबाणी, राजेशठोळे, सत्येन मुंदडा, संदीप कोयटे आदींनी जाहीर केले आहे.
लायन्स क्लबच्या डिस्ट्रिक्ट एडिशनल ट्रेझररपदी ला. सुधीर डागा, एडीशनल सेक्रेटरीपदी ला. डॉ. अभिजित आचारी व झोन चेअरमन पदी ला. सुमित भट्टड यांची निवड झाली असल्याचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ला. विजय सारडा यांनी जाहीर केले असून या सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचा निवडी बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. डिस्ट्रिक्ट (पुणे, नाशिक, अहमदनर) मध्ये कोपरगांव लायन्स क्लब सर्वात जुना चोपन्न वर्षा पासून स्थापन झालेला व कोपरगांव तालुक्यात सामाजिक क्षेत्रात सक्रिय  असलेला क्लब असून या क्लबद्वारे कोपरगाव तालुक्यात विविध समाजपोयगी कार्यक्रम राबविले जात असतात यात लायन्स बिझनेस एक्स्पो, लायन्स मूकबधिर विद्यालय, लायन्स पार्क, डायलिसिस युनिट, लायन्स डेंटल क्लिनिक यासारखे तब्वल बारा पर्मनंट उपक्रम लायन्स क्लबतर्फे राबविले जात आहे, तसेच कर्करोग तपासणी शिबीर, वृक्षारोपण, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, विविध आरोग्य शिबिरे, विविध शालेय स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणात गोडी निर्माण करण्यासाठी  विविध उपक्रम लायन्स क्लब कोपरगाव मार्फत राबविले जात असून यापुढे देखील लायन्स क्लब असेच समाजपोयगी उपक्रम मोठया जल्लोषात सर्वानुमते यशस्वीपणे राबवेल आशी ग्वाही नवनिर्वाचित लायन्स क्लब ऑफ कोपरगावचे अध्यक्ष अ‍ॅड. मनोज कडू यांनी दिली.

COMMENTS