Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कृष्णा बँकेच्या चेअरमनपदी डॉ. अतुल भोसले यांची बिनविरोध; व्हाईस चेअरमनपदी दामाजी मोरे यांची निवड

कराड / प्रतिनिधी : रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील कृष्णा सहकारी बँकेच्या चेअरमनपदी डॉ. अतुल भोसले यांची तर व्हाईस चेअरमनपदी दामाजी मोरे यांची बिन

वडार समाजाचा प्रश्‍न सोमवारी विधिमंडळात मांडणार : विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर
आ. जयंत पाटील यांनी एसटीची बस चालविल्याप्रकरणी आगार प्रमुखासह चालकावर कारवाईची भाजपाची मागणी; माझ्यावर खुशाल गुन्हा दाखल करा : आ. जयंत पाटलांचे प्रत्युत्तर
शिक्षकांच्या अनुकंपासह पायाभूत वाढीव पदांचा प्रश्न मार्गी लागणार

कराड / प्रतिनिधी : रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील कृष्णा सहकारी बँकेच्या चेअरमनपदी डॉ. अतुल भोसले यांची तर व्हाईस चेअरमनपदी दामाजी मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कृष्णा सहकारी बँकेला कृष्णाकाठची अर्थवाहिनी म्हणून ओळखले जाते. सुवर्णमहोत्सवी वर्षे पूर्ण केलेल्या या बँकेच्या सन 2022-23 ते 2026-27 या पंचवार्षिक कालावधीसाठी संचालक मंडळासाठीची निवडणूक प्रक्रिया नुकतीच बिनविरोध झाली. आज झालेल्या नूतन संचालक मंडळाच्या बैठकीत कराड तालुका सहकारी संस्थांचे उपनिबंधक संदीप जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीची प्रक्रिया झाली. यावेळी डॉ. अतुल भोसले यांची चेअरमनपदी; तर दामाजी मोरे यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांनी नूतन पदाधिकार्‍यांचे व संचालकांचे अभिनंदन करून, नूतन संचालक मंडळाने सभासदांचा विश्‍वास सार्थ ठरवत बँकेला प्रगतीपथावर न्यावे, असे आवाहन केले.
दरम्यान, यावेळी पत्रकारांशी संवाद साधनाता डॉ. अतुल भोसले म्हणाले, सहकार महर्षी जयवंतराव भोसले आप्पांनी त्यांच्या सहकार्‍यांच्या मदतीने 1971 साली कृष्णा सहकारी बँकेची स्थापना केली. बँकेने स्थापनेपासून ग्रामीण भागातील कष्टकरी, शेतकरी व गोरगरीबांना अर्थसहाय्य केले आहे. डॉ. सुरेशबाबांनी बँकेला संघर्षाच्या काळात टिकवून ठेवण्याचे महत्वाचे काम केले. या संघर्षातून वाटचाल करत बँकेने आजची ही प्रगती साधली आहे. सन 2003 मध्ये चेअरमनपदाची संधी मिळाल्यानंतर संचालक मंडळाच्या सहकार्याने मला बँकेचा विस्तार करता आला. गेल्या 10 वर्षात बँकेचा एनपीए शून्य टक्के राहिला आहे. बँकेला आज महाराष्ट्रातील एक अग्रगण्य आर्थिक संस्था म्हणून ओळखले जाते. तसेच बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण 18.53 टक्के इतके आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर व पुणे अशा 4 जिल्ह्यात बँकेचे कार्यक्षेत्र पसरले आहे. लवकरच राज्यभर कार्यक्षेत्र मिळावे, अशी आम्ही मागणी केली आहे. बँकेला विविध संस्थांकडून गेल्या अनेक वर्षात अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 30 जूनअखेर बँकेचा एकूण व्यवसाय 771 कोटींहून अधिक झाला आहे. मार्च 2023 अखेर बँकेचा एकूण व्यवसाय 1000 कोटीपर्यंत नेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. सर्व संचालकांनी व सभासदांनी चेअरमनपदाची पुन्हा संधी दिल्याबद्दल मी त्यांचे मन:पूर्वक आभार मानतो.
यावेळी बँकेचे संचालक शिवाजीराव थोरात यांची सातारा जिल्हा नागरी बँक्स असोसिएशनच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपनिबंधक कार्यालयातील मुख्य लिपिक एफ. एस. गावित, बँकेचे नूतन संचालक शिवाजी पाटील, हर्षवर्धन मोहिते, प्रमोद पाटील, प्रकाश पाटील, गिरीश शहा, रणजीत लाड, प्रदीप थोरात, नामदेव कदम, विजय जगताप, श्रीमती सरिता निकम, सौ. सारिका पवार, अनिल बनसोडे, संतोष पाटील, नारायण शिंगाडे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कापसे, भगवान जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS