Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आंदोलनाचा इशारा देताच वीजपुरवठा सुरळीत

कर्जत : भांबोरा फिडर नंबर 1 अनेक दिवसांपासून बंद असल्याने शिंपोरा, मानेवाडी, बाभूळगाव भागात वीज पुरवठ्याअभावी शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत असल्या

नगरचे आ. संग्राम जगतापांविरोधात न्यायालयात खासगी दावा दाखल
धनंजय मुंडेंनी यंत्रणा कामाला लावली अन 48 तासात उभारले 50 ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर | पहा Lok News24
उक्कडगावमध्ये मुंजोबा विद्यालयाच्या प्रवेशद्वाराचे लोकार्पण

कर्जत : भांबोरा फिडर नंबर 1 अनेक दिवसांपासून बंद असल्याने शिंपोरा, मानेवाडी, बाभूळगाव भागात वीज पुरवठ्याअभावी शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत असल्याने शिवसेनेचे नेते बिभीषण गायकवाड यांनी महावितरणला निवेदन दिले.  या निवेदनातून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्याची दखल घेत 12 मार्चपासून वीजपुरवठा सुरळीत केला जाईल. नवीन फिडर चालू होईपर्यंत 6 तास वीज सोडली जाईल व नंतर 8 तास वीजपुरवठा केला जाईल असे आश्‍वासन उपअभियंता डेकाटे यांनी दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात असल्याचे गायकवाड म्हणाले. यावेळी वायरमन ठोंबरे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS