नवी दिल्ली ः लोकसभा निवडणुकीनिमित्त सुरू असलेली रणधुमाळी जोमात सुरू असली तरी काँगे्रसची गळती काही थांबण्याची चिन्हे नाहीत. विविध राज्यांतून काँगे
नवी दिल्ली ः लोकसभा निवडणुकीनिमित्त सुरू असलेली रणधुमाळी जोमात सुरू असली तरी काँगे्रसची गळती काही थांबण्याची चिन्हे नाहीत. विविध राज्यांतून काँगे्रस पक्षातील पक्षातील नेते सोडून जातांना दिसून येत आहे. राजधानी दिल्लीमध्ये देखील पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अरविंदर सिंग लवली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून राजीनाम्याचे कारण स्पष्ट केले आहे.
लवली यांनी खरगे यांना 40 पानी पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी लिहिले की, दिल्ली काँग्रेस युनिट काँग्रेस पक्षावर भ्रष्टाचाराचे खोटे, बनावट आणि दुर्भावनापूर्ण आरोप करण्याच्या आधारावर स्थापन झालेल्या पक्षाशी युतीच्या विरोधात होती. असे असतानाही पक्षाने दिल्लीत ’आप’सोबत युती करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीतील तिकीट वाटपावरून लवली नाराज आहेत. काँग्रेसने त्यांना 31 ऑगस्ट 2023 रोजी दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष केले. लवली यांनी शीला दीक्षित यांच्या सरकारमध्ये 15 वर्षे परिवहन आणि शिक्षणासह अनेक मंत्रालये सांभाळली आहेत. दिल्लीतील शीख समाजात त्यांचा चांगला प्रभाव आहे. अरविंदर सिंग लवली यांनी शीला दीक्षित सरकारमध्ये 15 वर्षे शिक्षण आणि पर्यटन मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली आहे. 2017 च्या महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, अवघ्या वर्षभरातच ते पक्षात परतले होते. काँग्रेसमध्ये परतताना लवली म्हणाले की, मी तिथे वैचारिकदृष्ट्या मिसफिट होतो असा आरोप लवली यांनी केला आहे.
COMMENTS