Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कलाकार प्रमोद पंडित यांचा नरहरी सेनेच्या वतीने सत्कार

राहुरी ः राहता तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथील चित्रपट व मालिका क्षेत्रातील कलाकार प्रमोद पंडित यांचा नुकताच भारतीय नरहरी सेनेच्या वतीने सत्कार क

2022 सुरू होण्यापूर्वी शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवणार -शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील
आरक्षणप्रश्‍नी मराठा आंदोलक आक्रमक
समाधान ही जीवनातील खरी आनंदनिर्मित कमाई असते – गुलाबराव पादिर

राहुरी ः राहता तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथील चित्रपट व मालिका क्षेत्रातील कलाकार प्रमोद पंडित यांचा नुकताच भारतीय नरहरी सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला प्रमोद पंडित यांनी ग्रामीण भागात राहत असूनही व आपल्या दिव्यांगावर मात करीत विविध मालिका व चित्रपटांमध्ये आपली वेगळी अशी छटा जगासमोर आणली आहे. अभिनेते, दिग्दर्शक व अपंग सेवा दलाचे अध्यक्ष प्रमोद पंडित यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते दोन वर्षांपूर्वी कलारत्न पुरस्कार मिळालेला आहे. लोणी येथील भारतीय नरहरी सेनेचे महाराष्ट्राचे प्रसिद्धीप्रमुख रवी माळवे, मेजर शेवंते, अशोक काका मैड, रवीशेठ मैड, रविशेठ माळवे, मेजर यांनी आपल्या भाषणातून अभिनेते यांचे कला व अभिनयाची तारीफ करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी अभिनेत्री दुर्गा बावके यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी संतोष माळवे, ज्ञानेश्‍वर साबळे व महिला पदाधिकारी अर्चनाताई लोळगे, साबळेताई, वैष्णवी लोळगे उपस्थित होते.

COMMENTS