Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तोफखाना पोलिसांची मद्यपी वाहन चालकाविरुद्ध कारवाईची मोहीम 

अहमदनगर : तोफखाना पोलिसांनी वाहतुकीस अर्थात ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई तसेच मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू केली

बाबा आमटे विकास सेवा संस्था श्रीगोंदा येथे कला कार्यशाळा उत्साहात  
पाणी सोडत नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नाही
शासनाच्या योजना कलाकारांपर्यंत पोहचवाव्यात -संभाजी कदम

अहमदनगर : तोफखाना पोलिसांनी वाहतुकीस अर्थात ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई तसेच मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू केली .या मोहिमेअंतर्गत तोफखाना पोलिसांनी पाईपलाईन रोडवरील केलेल्या कारवाईत तीन मद्यपी वाहन चालकांविरुद्ध कारवाई केली.दारु पिऊन बेदरकारपणे हयगयीने वाकडी तिकडी मोटारसायकल चालवून स्वतःच्या व इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा तऱ्हेने मोटारसायकल चालवणाऱ्या  चालकाविरुद्ध ही कारवाई केली.

तोफखाना पोलिस पाईप लाईन रोडवरील भिस्तबाग चौक येथे नाकाबंदी ड्यूटी करीत असताना रात्री 11 वाजण्याचा सुमारास एक मोटारसायकल स्वार त्याच्या ताब्यातील मोटार सायकल (क्रमांक एम एच सोळा ए जे  4188) बेदरकारपणे हयगयीने वाकडी तिकडी चालवताना मिळून आला. म्हणुन पोलिसांनी त्याला थांबवून त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव विजय हरिभाऊ अरसुळे (वय 47 रा. दिल्लीगेट,अ.नगर) असे असल्याचे सांगितले.त्याच्या तोंडाचा उग्र वास आल्याने पोलिसांनी त्याची ब्रेंन्थ नालायझर मशीन द्वारे टेस्ट केली असता त्यात 70.5 एम जी 100 असे अल्कोहोलचे प्रमाण येऊन त्याची टेस्ट पॉझिटिव्ह आली. या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी पोलिस नाईक राहुल शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन विजय अरसुळे यांच्या विरुद्ध भारतीय दंड विधान कायदा कलम 279, मोटार वाहन कायदा कलम 185 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास तोफखाना पोलिस करीत आहेत.

दुसऱ्या कारवाईत तोफखाना पोलिस पाईप लाईन रोडवरील भिस्तबाग चौक येथे नाकाबंदी ड्यूटी करीत असताना रात्री साडेदहा वाजण्याचा सुमारास एक मोटारसायकल स्वार त्याच्या ताब्यातील मोटार सायकल (क्रमांक एम एच सोळा ए 8379) बेदरकारपणे हयगयीने वाकडी तिकडी चालवताना मिळून आला. म्हणुन पोलिसांनी त्याला थांबवून त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव अंबादास मल्हारी कांबळे (वय 47 रा. अशोक नगर, भिस्तबाग अ.नगर) असे असल्याचे सांगितले.त्याच्या तोंडाचा उग्र वास आल्याने पोलिसांनी त्याची ब्रेंन्थ नालायझर मशीन द्वारे टेस्ट केली असता त्यात 73.3 एम जी 100 असे अल्कोहोलचे प्रमाण येऊन त्याची टेस्ट पॉझिटिव्ह आली. या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी पोलिस नाईक राहुल शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अंबादास कांबळे यांच्या विरुद्ध भारतीय दंड विधान कायदा कलम 279, मोटार वाहन कायदा कलम 185 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास तोफखाना पोलिस करीत आहेत.

तिसऱ्या कारवाईत तोफखाना पोलिस पाईप लाईन रोडवरील भिस्तबाग चौक येथे नाकाबंदी ड्यूटी करीत असताना रात्री साडेनऊ वाजण्याचा सुमारास एक मोटारसायकल स्वार त्याच्या ताब्यातील मोटार सायकल (क्रमांक एम एच सोळा बी जे 8844) बेदरकारपणे हयगयीने वाकडी तिकडी चालवताना मिळून आला. म्हणुन पोलिसांनी त्याला थांबवून त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव दत्तात्रय कृष्णा देवनपल्ली  (वय 59 रा. पाईप लाईन रोड अ.नगर) असे असल्याचे सांगितले.त्याच्या तोंडाचा उग्र वास आल्याने पोलिसांनी त्याची ब्रेंन्थ नालायझर मशीन द्वारे टेस्ट केली असता त्यात 98.5 एम जी 100 असे अल्कोहोलचे प्रमाण येऊन त्याची टेस्ट पॉझिटिव्ह आली. या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी पोलिस नाईक राहुल शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दत्तात्रय देवनपल्ली यांच्या विरुद्ध भारतीय दंड विधान कायदा कलम 279, मोटार वाहन कायदा कलम 185 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास पोलिस हवालदार आव्हाड करीत आहेत. ही कारवाई सातत्याने सुरू राहील अशी माहिती पोलिस निरीक्षक कोकरे यांनी दिली.

COMMENTS