Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देवळाली नगरपालिकेकडून 3 ठिकाणी कृत्रिम विसर्जन केंद्र

मुख्याधिकारी विकास नवाळे यांची माहिती

देवळाली प्रवरा ः देवळाली प्रवरा नगरपरिषदे मार्फत माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले

आंबेडकरी कार्यकर्त्यांचा गौरव अकोल्यासाठी अभिमानाची बाब ः विजय पवार
पिंजर्‍यात अडकलेल्या बिबट्याने दरवाजा तोडून ठोकली धूम
अर्बन बँकेच्या सोनेतारणात घोळ… ३० पिशव्यांमध्ये सापडले बेन्टेक्सचे दागिनेl पहा LokNews24

देवळाली प्रवरा ः देवळाली प्रवरा नगरपरिषदे मार्फत माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले होते गणेश विसर्जन करणे करिता देवळाली प्रवरा नगरपरिषदेने 03 ठिकाणी कृत्रिम विसर्जन आणि संकलन केंद्र उभारण्याची सोय करण्यात येणार असून तसेच देवळाली प्रवरा व राहुरी कारखाना परिसरात गणेश मूर्ती संकलन करणे करीता 04 फिरते संकलन वाहन उपलब्ध ठेवण्यात आलेले आहेत असी माहिती देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी दिली आहे.
           देवळाली प्रवरा व राहुरी कारखाना परिसरात पर्यावरण पूरक गणेेत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते त्याच प्रमाणे गणेश विसर्जन हि पर्यावरण पूरक पद्धतीने करण्यासाठी नगरपरिषदेच्या वतीने कृत्रिम संकलशान व विसर्जन केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहे नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे कि गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी नगरपरिषदेने उपलब्ध करून दिलेल्या केंद्रावरच गणेश विसर्जन करण्यात यावे इतर ठिकाणी गणेश विसर्जन करून पर्यावरणाचा र्‍हास टाळण्याचे आवाहन मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी केले आहे. देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या वतीने शहरात माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत पर्यावरण पूरक गणेशोत्सवसाजरा करण्यात आला आहे नागरिकांनसाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा केला. त्याचप्रमाणे गणेश विसर्जन ही पर्यावरण पूरक पद्धतीने करण्यात यावे. यासाठी नगरपरिषदेने 03 ठिकाणी कृत्रिम विसर्जन आणि संकलन केंद्र व 04 फिरते संकलन वाहन उपलब्ध करून दिलेले  आहे तसेच सर्व जमा केलेल्या गणेश मूर्तीचे अमोनियम बायकार्बोनेटच्या सहायाने शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जित करणेत येणार आहे. तसेच जमा केलेल्या निर्माल्याचे खत तयार करणार आहे. तरी सर्व शहरवासियांनी सदर अभियानात सहभाग घ्यावा व नगपरिषदेस सहकार्य करावे. असे आवाहन मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी केले आहे.

COMMENTS