Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाबा आमटे विकास सेवा संस्था श्रीगोंदा येथे कला कार्यशाळा उत्साहात  

श्रीगोंदा शहर : परभणी येथ चॅरिटेबल अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज या संस्थेच्यावतीने बालकांचे मोबाईल व्यसन दूर व्हावे व बालकांमध्ये वाचन संस्कृती र

महाराष्ट्र दिनानिमित्त आ. आशुतोष काळेंच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात
रोहित पवार यांच्या हटके टी-शर्टची विधीमंडळात चर्चा
गुणवत्ता हीच भविष्याची खरी श्रीमंती होय : डॉ. बाबुराव उपाध्ये

श्रीगोंदा शहर : परभणी येथ चॅरिटेबल अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज या संस्थेच्यावतीने बालकांचे मोबाईल व्यसन दूर व्हावे व बालकांमध्ये वाचन संस्कृती रुजावी आणि बालकांचा कला विकास मनोरंजक पद्धतीने व्हावा. या उद्देशाने सदरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर प्रकल्प संचालक अनंत झेंडे, विकास पाटील, शुभांगी झेंडे व कार्यशाळेचे मुख्य प्रवर्तक तथा कला शिक्षक पांडुरंग पाटणकर हे उपस्थित होते.
कार्यशाळेचे उद्घाटन अनंत झेंडे यांनी केले. कार्यशाळेत पांडुरंग पाटणकर यांनी सकाळ सत्रात, वारली पेंटिंग विविध माध्यम प्रिंट, शाडो पपेट आदी बाहुलीकाम शिकवले. या बरोबरच कागदकाम ललित कला विषयी माहिती, विविध माध्यम प्रिंट, टाळ्यांचे प्रकार,कोलाज चित्र आणि सुतळी काम या विषयी मार्गदर्शन केले. द्वितीय सत्रात शेकोटी कार्यक्रमावेळी बालकांच्या चेहर्‍यावर आनंद दिसून येत होता. तल्लीन होऊन वस्तीगृहातील आदिवासी मुलांनी कृतीशील सहभाग नोंदविला. यावेळी 150 विद्यार्थी सहभागी होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विकास पाटील यांनी केले तर आभार शुभांगी झेंडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आशिष लाकुडझोडे, अश्‍विनी बारबोले, प्रसाद घोंडगे,लता पवार, चंद्रभागा सुरडकर, सविता गायकवाड यांनी सहकार्य केले तसेच सदरील कार्यक्रमासाठी एच ए आर सी संस्थेचे डॉक्टर पवन चांडक आणि प्राध्यापक शिवा आयथॉल यांचे सहकार्य लाभले.

COMMENTS