अर्धापूर ः तालुक्यातील पार्वतबाई सूर्यवंशी यांची निर्दयपणे हत्या करणार्या आरोपीला पोलिसांनी लवकरात लवकर अटक करावी यासाठी पोलीस अधीक्षक यांच्याशी

अर्धापूर ः तालुक्यातील पार्वतबाई सूर्यवंशी यांची निर्दयपणे हत्या करणार्या आरोपीला पोलिसांनी लवकरात लवकर अटक करावी यासाठी पोलीस अधीक्षक यांच्याशी बोलणार असल्याची माहिती आ.श्रीजया चव्हाण यांनी पार्वतीबाई सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करतांना माहिती दिली आहे.
दाभड येथील महिला पार्वतबाई सूर्यवंशी यांची निर्दयपणे हत्या करणार्या आरोपीचा पोलिसांनी लवकरात लवकर अटक करून सुर्यवंशी कुटुंबीयांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.जेजे तपास करावा लागेल त्यासाठी संबंधितांना बोलू आरोपीला अटक करून अमच्या हवाली करा अशी मागणी दाभड येथील महिलांनी आ. श्रीजया चव्हाण यांच्या कडे केली आहे. दाभड व परिसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्यांची भीती दूर करण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावी व आरोपीचा बंदोबस्त करावा अशा सूचना पोलिसांना आ.श्रीजया चव्हाण यांनी दिल्या.या खुनातील आरोपीला अटक झाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही अशी आश्वासन सूर्यवंशी कुटुंबीयांना दिले आहे.तसेच अन्य एका घटनेत
दाभड महिला कलावतीबाई तारडे यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला होता.त्यांच्या घरी जाऊन तारडे कुटुंबीयांचे आ.श्रीजया चव्हाण यांनी सांत्वन केले. यावेळी गावकर्यांनी आम्हाला राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करतांना जिव मुठीत धरून रस्ता क्रॉस करावा लागतो.यासाठी येजा करण्यासाठी भुयारी पूल किंवा पर्यायी मार्ग विना अपघात मुक्त रस्ता उपलब्ध करून द्यावा जेणेकरून अपघातात बळी जाणार नाही यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार्यांशी बोलून सुरक्षित रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी गावकर्यांनी केली. यावेळी तालुकाध्यक्ष बालाजी गव्हाणे, माजी उपनगराध्यक्ष राजेश्वर शेटे,शंकर टेकाळे,संजय पाटील टेकाळे,राजू टेकाळे,गणेश तरटे,अजय देशमुख,उमाकांत सरोदे,स्वप्निल टेकाळे, पवन इंगोले, विलास साबळे,योगेश हळदे,शंकर ढगे,रवी सूर्यवंशी,आकाश सूर्यवंशी,गोविंद गोदरे यांच्यासह गावकरी मंडळी उपस्थित होते.

COMMENTS