Homeताज्या बातम्यादेश

न्यूज क्लिकच्या संपादकांची अटक बेकायदा

तात्काळ सुटका करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली ः चीनमधून निधी पुरवल्याच्या आरोपावरून न्यूजक्लिकचे संपादक प्रबीर पुरकायस्थ यांना अटक करण्यात आली होती. मात्र त्यांची ही अटक बेकायदा अस

शासनाच्या पेन्शन समिती आदेशाची केली होळी…
बीडमध्ये तीन बालकांचा मृत्यू, आईची मृत्यूशी झुंज | LokNews24
विक्रम लँडरने लावला पहिला मोठा शोध

नवी दिल्ली ः चीनमधून निधी पुरवल्याच्या आरोपावरून न्यूजक्लिकचे संपादक प्रबीर पुरकायस्थ यांना अटक करण्यात आली होती. मात्र त्यांची ही अटक बेकायदा असून, त्यांची तात्काळ सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिले आहेत. प्रबीर आणि न्यूज क्लिकचे एचआर प्रमुख अमित चक्रवर्ती यांना गेल्या वर्षी 3 ऑक्टोबर रोजी दिल्ली पोलिसांनी चीनकडून निधी पुरवल्याच्या आरोपावरून अटक केली होती.
निकाल देताना न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि न्यायमूर्ती मेहता यांच्या खंडपीठाने सांगितले की, प्रबीर पुरकायस्थ यांची दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत (यूएपीए) अटक बेकायदा असून, त्यांची तात्काळ कोठडीतून सुटका करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले. दिल्ली पोलिसांच्या एफआयआरनुसार, न्यूज क्लिकवर चिनी प्रचाराचा आणि देशाचे सार्वभौमत्व धोक्यात आणल्याचा आरोप होता. याशिवाय 2019 च्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक प्रक्रियेत व्यत्यय आणण्यासाठी पीपल्स अलायन्स फॉर डेमोक्रेसी अँड सेक्युलॅरिझमसोबत कट रचल्याचा आरोप पुरकायस्थ यांच्यावर आहे. मात्र सर्व आरोप बेकायदेशीर असल्याचे म्हणत त्यांची सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दिल्ली पोलिसांनी न्यूजक्लिक या वृत्त संकेतस्थळाने चीनकडून बेकायदा निधी घेतल्याचा प्रमुख आरोप करण्यात आला होता. तसेच चिनी प्रचारासाठी न्यूजक्लिकला कोट्यवधी रुपयांचा विदेशी निधी मिळाल्याचा आरोप आरोपपत्रात ठेवण्यात आला होता. हा निधी अमेरिकेच्या मार्गाने पुरवण्यात आल्याचे देखील दिल्ली पोलिसांनी एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले होते. या गुन्ह्यानुसार युएपीए कायद्यातील विविध कलमान्वये प्रबीर पुरकायस्थ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता सर्वोच्च न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीवेळी न्यूजक्लिकच्या संस्थापकाची अटक आणि त्यानंतर त्यांना झालेली कोठडी बेकायदेशीर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. तसेच त्यांच्या अटकेच्या वेळी पोलिसांनी पुरकायस्थ यांना अटक करण्याचे कारण दिले नव्हते. त्यामुळे त्यांना जामीन मिळण्याचा हक्क आहे. असे करण्यापूर्वी पोलिसांनी प्रबीर पुरकायस्थ यांच्या वकिलाला का कळवले नाही, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केली होती. सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना विचारले होते की, तुम्ही प्रबीर पुरकायस्थ यांच्या वकिलाला आधीच का सांगितले नाही? तुम्ही त्यांना संध्याकाळी अटक केली होती. त्याच्या वकिलाला माहिती देण्यासाठी तुमच्याकडे संपूर्ण दिवस होता.

चीनकडून निधी मिळाल्याचा होता आरोप – भारताच्या सार्वभौमत्वाला बाधा आणण्यासाठी आणि देशाविरुद्ध लोकांमध्ये असंतोष निर्माण करण्यासाठी या न्यूज पोर्टलला चीनकडून मोठा निधी मिळाला होता, या प्रकरणी तपास यंत्रणांनी 3 ऑक्टोबर 2023 रोजी या न्यूज पोर्टलच्या संपादकांना अटक केली होती. या प्रकरणात दिल्लीत 88 आणि इतर राज्यात 7 ठिकाणी छापे टाकण्यात आले. न्यूजक्लिकच्या कार्यालयातून आणि पत्रकारांच्या निवासस्थानातून सुमारे 300 इलेक्ट्रॉनिक उपकरणेही जप्त करण्यात आली आहेत.

COMMENTS