Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ. गोरेंना तत्काळ अटक करा; अन्यथा 25 ला आंदोलन; जनता क्रांती दलाचा इशारा

मायणी / वार्ताहर : मृत व्यक्तीच्या नावे संगनमताने बोगस कागदपत्रे बनविणे, प्रतिज्ञापत्र तयार करून अनुसूचित जातीच्या घटकांची फसवणूक करणे आदी बेकायद

खा. शरद पवार साहेब यांच्या घरावरील हल्ल्याचा पाटणमध्ये निषेध
’टेंभू’च्या गलथान कारभाराविरोधात याचिका दाखल करणार : डी. एस. देशमुख
शामगाव येथे लोकसहभागातून महिला कुस्ती संकुल

मायणी / वार्ताहर : मृत व्यक्तीच्या नावे संगनमताने बोगस कागदपत्रे बनविणे, प्रतिज्ञापत्र तयार करून अनुसूचित जातीच्या घटकांची फसवणूक करणे आदी बेकायदेशीर कृत्यांबद्दल आमदार जयकुमार गोरे यांच्यावर ट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, अद्याप त्यांना पोलिसांनी अटक केली नाही. गोरे यांना तत्काळ अटक करावी, अन्यथा सोमवार, दि. 25 रोजी जनता क्रांती दल व समविचारी संघटनांना बरोबर घेऊन तहसील कार्यालयावर आंदोलन करणार असल्याचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे. त्यासंबंधीचे लेखी निवेदन आज जनता क्रांती दलाच्या पदाधिकार्‍यांनी खटाव तहसीलदारांना दिले.
निवेदनात म्हटले आहे की, मायणीतील महादेव भिसे यांचे वडील पिराजी विष्णू भिसे हे वृध्दापकाळाने मयत झाले. तरीही त्यांच्या जागी कोणीतरी अज्ञात उभा करून त्याचे बनावट आधारकार्ड तयार करून आमदार व इतर कार्यकर्त्यांनी शंभर रुपयांचे स्टॅम्पवर बोगस प्रतिज्ञापत्र तयार केले. भिसे यांच्या आधारकार्डाची छेडछाड करून बनावट आधारकार्ड तयार केले.
आ. गोरे यांनी सहकार्‍यांशी संगनमत करून भिसेंच्या ठिकाणी दुसर्‍याच व्यक्तीला उभे करून भिसे कुटुंबियांची फसवणूक केली आहे. भिसे कुटुंबियांच्या घरावरही त्यांनी टाच आणली आहे. त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, अद्याप त्यांना पोलिसांनी अटक केली नाही. आ. गोरे यांना अटक न झाल्यास सोमवार, दि. 25 रोजी वडूज तहसील कार्यालयावर जनता क्रांती दल समविचारी संघटनांना बरोबर घेऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला. निवेदनावर जनता क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष सत्यवान कमाने, गणेश भिसे, विकास सकट, दत्ता केंगार यांच्या सह्या आहेत.

COMMENTS