Homeताज्या बातम्याक्रीडा

अर्जुनचा व्हायरल व्हिडिओ फेक!

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरबद्दल सध्या बरीच चर्चा सुरु आहे. मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू अर्जुन तेंडुलकरचे केकेआर वि

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने केली निवृत्तीची घोषणा
छत्रपती शिवाजी महाराज प्रीमियर लीग पर्व दुसरेचे सुपर सिक्सर विजेते
81 व्या औंध संगीत महोत्सवास दिमाखात प्रारंभ

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरबद्दल सध्या बरीच चर्चा सुरु आहे. मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू अर्जुन तेंडुलकरचे केकेआर विरुद्धच्या सामन्यात आयपीएलमध्ये पदार्पण झाले. परंतु याच दरम्यान अर्जुनचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून ज्यात अर्जुनने केलेले कृत्य पाहून लोकांना किळस वाटत आहे. आयपीएल 2023 मध्ये 35 वा सामना 25 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात खेळवण्यात आला होता. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा गुजरातकडून दारुण पराभव झाला असून गुजरात टायटन्सने हा सामना 55 धावांनी जिंकला होता.  या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने 1 विकेट घेऊन बॅटिंग करताना 13  धावा केल्या. परंतु या सामन्यांनंतर सोशल मीडियावर अर्जुन तेंडुलकर चा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. यात अर्जुन मैदानावर फिल्डिंग करीत असताना नाकात टाकलेले बोट पुन्हा तोंडात टाकत असताना दिसला. अर्जुनचे हे किळसवाणे कृत्य पाहून लोकांनीही त्याच्याबद्दल अनेक चुकीची मत तयार केली. परंतु आता या व्हिडिओ मागील सत्य समोर आले आहे. अर्जुन तेंडुलकरचा हा व्हिडिओ बनावट असल्याचे समोर आले आहे. मूळ व्हिडिओ सोबत छेडछाड करून हा व्हिडिओ तयार करण्यात आल्याचे समजते आहे. व्हायरल झालेला  व्हिडीओ रिव्हर्स करण्यात आला आहे. म्हणजेच ओरिजनल व्हिडीओ हा शेवटापासून सुरु होतोय. याचाच अर्थ अर्जुनने नाकातील बोट तोंडात घातलेलं नाही. तर ओरिजनल व्हिडिओ मध्ये तो तोंडात घातलेले बोट नाकात टाकत असल्याचे दिसते. एका ट्विटर युझरने अर्जुनचा ओरिजनल व्हिडिओ शेअर केला आहे

COMMENTS