Homeताज्या बातम्यादेश

अर्जुनराम मेघवाल नवे कायदामंत्री

किरण रिजिजू यांना कायदेमंत्री पदावरून हटवले

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः भाजप नेते किरण रिजिजू यांनी कायदेमंत्री पदावर असतांना कॉलेजियम पद्धतीवर भाष्य करतांना, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच

पुण्यात कर्नाटकच्या बसेसना फासले काळे
नर्स चा ड्रेस घातला आणि 3 महिन्याच्या मुलीला घेऊन पळून गेली.
राष्ट्रवादीचा गड राखण्यासाठी कार्यकर्ते सरसावलेय; किनवट मध्ये राष्ट्रवादी पुन्हा

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः भाजप नेते किरण रिजिजू यांनी कायदेमंत्री पदावर असतांना कॉलेजियम पद्धतीवर भाष्य करतांना, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या निवड पद्धतीवर जाहीर टीका केली होती. त्यांनी न्यायव्यवस्थेसंदर्भात जाहीर भाष्य केल्यामुळे न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर गुरूवारी किरण रिजिजू यांना कायदेमंत्रीपदावरून हटवत अर्जुनराम मेघवाल यांना नवे कायदामंत्री करण्यात आले आहे. किरण रिजिजू यांच्याकडे पृथ्वी विज्ञान मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
राष्ट्रपती भवनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रपतींनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सदस्यांच्या खात्यांमध्ये फेरबदलाला मंजुरी दिली. यानुसार किरण रिजिजू यांच्याकडे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी अर्जुन राम मेघवाल यांना कायदा मंत्री पदाचा अतिरिक्त भार देण्यात आला आहे. अर्जुन राम मेघवाल यांच्याकडे सध्या असलेल्या खात्यांशिवाय कायदा आणि न्याय मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून स्वतंत्र जबाबदारी देण्यात आली आहे. सध्या मेघवाल हे संसदीय कामकाज आणि सांस्कृतिक राज्यमंत्री आहेत. रिजिजू यांना जुलै 2021 मध्ये रविशंकर प्रसाद यांच्या जागी कायदा मंत्री म्हणून नियुक्त केले होते. रिजिजू हे गेल्या काही काळापासून न्यायालयातील नियुक्त्यांबाबत असलेल्या कॉलेजियम सिस्टिमविरुद्ध केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत होते. अर्जुनराम मेघवाल हे राजस्थानमधील एक मोठे नेते म्हणून परिचित असून ते सध्या संसदीय कार्य आणि सांस्कृतिक मंत्री आहेत. त्यांच्याकडे आता कायदा आणि न्याय विभागाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे. मेघवाल हे सेवानिवृत्त आयएएस अधिकारी होते. ते मूळचे राजस्थानचे आहेत. राजस्थानमधील एक मोठे नेते म्हणून ते परिचित आहेत.

COMMENTS