Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिसांचे नेमके गुन्हेगारांना भय की अभय ?

अहिल्यानगर- नगर शहर व उपनगर विभागात पाच पोलिस ठाणे आहेत. सर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसाय जोरात असून याकडे पोलिस अधिकार्यांचे दुर्लक्ष ह

धुळ्यात एकाच कुटुंबांतील चौघांची आत्महत्या
जागृती शुगर कडून 200 रुपयाचा हप्ता उस उत्पादक शेतक-यांच्या खात्यावर जमा
रिक्षा चालकांना मिळणार दहा हजार रूपये :परिवहनमंत्री सरनाईक यांची घोषणा

अहिल्यानगर- नगर शहर व उपनगर विभागात पाच पोलिस ठाणे आहेत. सर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसाय जोरात असून याकडे पोलिस अधिकार्यांचे दुर्लक्ष होत आहे. पोलिस प्रशासनाचे गुन्हेगारांना भय नसल्याने तडीपार गुंड देखील पोलिसांच्या नाकावर टिच्चून शहरात वावरत आहेत. मात्र, जर गुडांना पोलिसांचे भय राहिले नसुन त्याच गुंडाना पोलसांकडून अभय दिले जात असल्याचा सुर आता नागरीकांमधून आवळला जात आहे.
शहरात आणि उपनगरात छोट्या मोठ्या कारवाया होतात. परंतु बड्या धेंडावर कारवाई करण्याची कुणाचीही हिंमत होत नाही. पोलिस प्रशानाने वास्तविक पाहता सर्वसामान्यांना मदतीचा हात व गुंडाना धाक दाखवण्याचे काम केले पाहिजे. मात्र, तसे न होता बडे धेंड आणि पोलिसातील काही लोकांचे लागेबांधे असल्याने बड्या गुंडाना अभय देत छोट्या छोटया कारवाया करुन कामकाज सुरु असल्याचे दाखवले जाते. शहरात जुगार, बिंगा, मटका, अवैध दारु, अवैध वाहतुक, चोर्या, दरोडे, दुचाकी चोरी, गंठणचोर, खुन, हल्ले, गॅसरिफीलींग, फसवणूक, हुंडाबळी छेडछाड आदी गुन्हयांमध्ये कमालीची वाढ होताना दिसत आहे. परंतु याकडे दुर्लक्ष केले जाते. गुन्हेगारीचा आलेख वाढत असला तरी यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन कुचकामी ठरताना दिसत आहे. गुन्हेगारी आणि कारवाई याचा आलेख पाहता गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला असून कारवाई आणि गुन्हे उघडकिस आणण्याचे प्रमाण नगन्य आहे. शहरात शांतता व सुख नांदण्यासाठी आता पोलिस प्रशासनाने कामकाजात बदल करुन गुन्हेगारांना जबर बसेल अशा पध्दतीने कामकाजाची रुपरेषा आखण्याची गरज आहे. अन्यथा एक दिवस गुन्हेगार हे वरचढ होण्यास वेळ लागणार नाही हे मात्र निश्‍चित. शहरातील कोतवाली, तोफखाना, एमआयडीसी, नगर तालुका, भिंगार कॅम्प हद्दीत सरासरी गुन्हेगारी वाढली असून गुन्हेगारीचा हा आखेल कमी करण्यासाठी पोलिस महासंचालक काय आदेश देणार आणि पोलिस अधिक्षक यावर पुढील नियोजन काय करणार याकडे आत नगरकरांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, पालकमंत्र्यांना बदनाम करण्याचा डाव?
शहरातील कोतवाली, तोफखाना, एमआयडीसी, नगर तालुका,
भिंगार कॅम्प पोलिस स्टेशन आवारात पोलिसांनी नेमलेले दलालांची नामावली.
रात्रीच्या गस्तीवर असलेले पोलिस अनधिकृतपणे कुणाच्याही घरात घुसणारे कोतवाली,
तोफखाना, एमआयडीसी, नगर तालुका, भिंगार कॅम्प पोलिसांची नावे जाहीर करणार.
प्रत्येक पोलिस स्टेशनचे कलेक्टर (पोलिस शिपाई) यांची नावे उद्या जाहीर करणार
पोलिसांची मोगलाई माजली काय? व्हिडिओ शूटिंग पुराव्यानिशी सोमवारपासून प्रकाशित करणार.

COMMENTS