Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भर बाजारात कमानीचा स्लॅप कोसळला; चार महिला बालंबाल बचावल्या

घोगरगावातील घटना; जीर्ण बांधकामांवर कारवाईची मागणी श्रीगोंदा : तालुक्यातील घोगरगाव येथे भर बाजाराच्या दिवशी अत्यंत धक्कादायक घटना घडली. गावातील सर्वाधिक वर्दळीच्या ठिकाणी, ग्रामपंचायत कार्यालयाच्या शेजारी असलेल्या कमानीच्या आतील स्लॅपचा काही भाग अचानक कोसळल्याने परिसरात भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत चार महिला थोडक्यात बचावल्या असून मोठी जीवितहानी टळली आहे. घोगरगावमध्ये आठवडी बाजार असल्यामुळे त्या दिवशी परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होती. गावातील अनेक महिला भाजीपाला, किराणा व इतर वस्तू खरेदीसाठी बाजारात आल्या होत्या. ग्रामपंचायत कार्यालयालगत असलेल्या कमानीखाली काही महिला उभ्या असताना अचानक स्लॅपचा एक भाग मोठ्या आवाजात खाली कोसळला. काही क्षणांसाठी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला. या दुर्घटनेत चार महिला थोडक्यात बचावल्या. स्लॅपचा भाग त्यांच्या अंगावर पडला असता तर गंभीर जखमी होण्याची किंवा जीवितहानी होण्याची शक्यता होती. मात्र दैवकृपेने आणि काही क्षणांच्या फरकाने मोठा अनर्थ टळला, असे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. या घटनेनंतर बाजारात उपस्थित महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला. “गावातील इतक्या वर्दळीच्या ठिकाणी असलेली ही वास्तू अनेक दिवसांपासून जीर्ण अवस्थेत आहे. तरीही ग्रामपंचायतीने त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. आज आम्ही थोडक्यात बचावलो, पण उद्या एखाद्या नागरिकाचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ग्रामपंचायत कार्यालयाच्या शेजारील ही कमान आणि त्यावरील स्लॅप बराच काळ धोकादायक अवस्थेत होता. मात्र वेळेत त्याची दुरुस्ती किंवा तपासणी करण्यात आलेली नाही, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. भर बाजाराच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, गावातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असून अशा जीर्ण आणि धोकादायक बांधकामांची तातडीने पाहणी करून आवश्यक ती दुरुस्ती किंवा पाडकाम करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.

विखे पाटील फाउंडेशनचे दिव्यांगासाठीचे कार्य अतुलनीय  : भांगरे
विचारांचा दुष्काळ दूर करण्यासाठी ज्ञानेश्वरीची रचना : हभप म्हस्के
धरणात बुडून युवकाचा मृत्यू

घोगरगावातील घटना; जीर्ण बांधकामांवर कारवाईची मागणी

श्रीगोंदा : तालुक्यातील घोगरगाव येथे भर बाजाराच्या दिवशी अत्यंत धक्कादायक घटना घडली. गावातील सर्वाधिक वर्दळीच्या ठिकाणी, ग्रामपंचायत कार्यालयाच्या शेजारी असलेल्या कमानीच्या आतील स्लॅपचा काही भाग अचानक कोसळल्याने परिसरात भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत चार महिला थोडक्यात बचावल्या असून मोठी जीवितहानी टळली आहे.

घोगरगावमध्ये आठवडी बाजार असल्यामुळे त्या दिवशी परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होती. गावातील अनेक महिला भाजीपाला, किराणा व इतर वस्तू खरेदीसाठी बाजारात आल्या होत्या. ग्रामपंचायत कार्यालयालगत असलेल्या कमानीखाली काही महिला उभ्या असताना अचानक स्लॅपचा एक भाग मोठ्या आवाजात खाली कोसळला. काही क्षणांसाठी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला.

या दुर्घटनेत चार महिला थोडक्यात बचावल्या. स्लॅपचा भाग त्यांच्या अंगावर पडला असता तर गंभीर जखमी होण्याची किंवा जीवितहानी होण्याची शक्यता होती. मात्र दैवकृपेने आणि काही क्षणांच्या फरकाने मोठा अनर्थ टळला, असे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले.

या घटनेनंतर बाजारात उपस्थित महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला. “गावातील इतक्या वर्दळीच्या ठिकाणी असलेली ही वास्तू अनेक दिवसांपासून जीर्ण अवस्थेत आहे. तरीही ग्रामपंचायतीने त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. आज आम्ही थोडक्यात बचावलो, पण उद्या एखाद्या नागरिकाचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ग्रामपंचायत कार्यालयाच्या शेजारील ही कमान आणि त्यावरील स्लॅप बराच काळ धोकादायक अवस्थेत होता. मात्र वेळेत त्याची दुरुस्ती किंवा तपासणी करण्यात आलेली नाही, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. भर बाजाराच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, गावातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असून अशा जीर्ण आणि धोकादायक बांधकामांची तातडीने पाहणी करून आवश्यक ती दुरुस्ती किंवा पाडकाम करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.

COMMENTS