Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वेस-सोयगाव तलावाच्या 9.98 कोटींच्या कामास मान्यता

आमदार आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश

कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव मतदार संघातील वरच्या गावातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून वेस-सोयगाव रुपांत

गावठाणावरील 747 कुटुंबांना हक्काचे उतारे मिळणार
पिकविमा भरपाई मिळण्यासाठी मतदारसंघात पाहणी सुरु ः आ.काळे
शैक्षणिक संस्था चालक व शाळा-महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांची आमदार आशुतोष काळे घेणार बैठक

कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव मतदार संघातील वरच्या गावातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून वेस-सोयगाव रुपांतरीत साठवण तलावाच्या 9.98 कोटीच्या कामास जलसंधारण विभागाने प्रशासकीय मान्यता दिली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली असून मागणीची दखल घेवून वेस-सोयगाव रुपांतरीत साठवण तलावाच्या कामास प्रशासकीय मंजुरी दिल्याबद्दल त्यांनी महायुती शासनाचे आभार मानले आहे.
कायमच दुष्काळाच्या झळा सोसणार्‍या मतदार संघातील वरच्या भागातील नागरिकांना उन्हाळ्यात वर्षानुवर्षापासून पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे या नागरिकांची या पाणी टंचाईतून मुक्तता करण्यासाठी पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी वेस-सोयगाव साठवण तलावात साठविल्यास त्याचा फायदा नागरिकांना होवू शकतो व भू-गर्भाची पाणी पातळी वाढली जावून पाणी टंचाई कमी होवून सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात मदत होणार होती. त्यामुळे वरच्या भागात असलेल्या वेस-सोयगाव साठवण तलावाचे रुंदीकरण व खोलीकरण करणे अत्यंत गरजेचे होते. त्याबाबत आ. आशुतोष काळे यांनी  सदरच्या रुंदीकरण व खोलीकरण कामांचा प्रस्ताव जलसाधारण विभागाकडे पाठविला होता. त्याबाबत त्यांच्या सुरु असलेल्या सततच्या पाठपुराव्याची जलसंधारण विभागाने दखल घेवून वेस-सोयगाव साठवण तलावाच्या रुंदीकरण व खोलीकरण कामाच्या नऊ कोटी अठ्यान्नव लक्ष पंच्याऐंशी हजार खर्चाच्या कामास प्रशासकीय मंजुरी दिली आहे. वेस-सोयगाव साठवण तलावाचे खोलीकरण व रुंदीकरण झाल्यानंतर या साठवण तलावाची साठवण क्षमता वाढली जावून निळवंडे धरणातून मिळणारे पाणी साठविण्यासाठी देखील त्याचा मोठा उपयोग होणार आहे. या वेस-सोयगाव साठवण तलावापासून परिसरातील जवळपास दहा किलोमीटर परिसराला त्याचा फायदा होणार आहे. भूगर्भातील पाणी पातळी वाढली जावून पाणी टंचाई संपुष्टात येवून सिंचनासाठी देखील मोठी मदत होणार आहे. त्यामुळे वेस-सोयगाव रुपांतरीत साठवण तलाव परिसर व लगतच्या गावातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून त्यांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

COMMENTS