Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

’रत्नदीप’आयुर्वेद मेडिकल कॉलेजला मंजुरी

जामखेडचे नाव शैक्षणिक क्षेत्रात उंचावणार

जामखेड प्रतिनिधी ः रत्नदीप मेडिकल फाउंडेशन अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर या संस्थेच्या रत्नदीप आयुर्वेद मेडिकल कॉलेजला केंद्र शासनाच्या भारतीय चिकित्सा पध्

विश्वस्त पदाच्या माध्यमातून भाविकांची सेवा करण्याची संधी – सौरभ बोरा
अंत्यसंस्कारानंतर दहा दिवसांनी परतला तरुण!
“आता लॉकडाउन लावावाच लागेल” | Maharashtra Lockdown |

जामखेड प्रतिनिधी ः रत्नदीप मेडिकल फाउंडेशन अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर या संस्थेच्या रत्नदीप आयुर्वेद मेडिकल कॉलेजला केंद्र शासनाच्या भारतीय चिकित्सा पध्दती राष्ट्रीय आयोग, आयुष मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली, वैद्यकीय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांनी शैक्षणिक वर्ष 2022-23 पासुन शंभर विद्यार्थी क्षमतेसह मंजुरी दिली आहे. या मंजरीमुळे जामखेडचे नाव शैक्षणिक क्षेत्रात उंचावर जाणार.
नुसार शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा या चालु शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून संस्थेस आयुर्वेद (बीएएमएस) मेडिकल कॉलेज सुरू करण्यास मंजुरी मिळाली असून त्यामुळे जामखेड-कर्जत तालुक्यातील वैद्यकीय शिक्षणास प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी वैद्यकीय शिक्षणाची सोय होणार आहे. रत्नदीप आयुर्वेद मेडिकल कॉलेज रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर येथे चालू शैक्षणिक वर्षासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांचेमार्फत दिनांक 20 फेब्रुवारी 2023 ते 4 मार्च 2023 या काळात कॉलेज स्तरावर प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे अशी माहिती रत्नदीपचे अध्यक्ष डॉ भास्कर मोरे व सचिव डॉ. वर्षा मोरे यांनी दिली.

COMMENTS