जगदेश कुमार यांची युजीसीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

Homeताज्या बातम्यादेश

जगदेश कुमार यांची युजीसीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

नवी दिल्ली : दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) कुलगुरु एम. जगदेश कुमार यांची विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) अध्यक्षपदी नियुक्ती कर

वाढते प्रदूषण चिंताजनक
अवैध गर्भपात प्रकरणातील संशयित महिला पोलिसांच्या ताब्यात | LOK News 24
मंत्री धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात

नवी दिल्ली : दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) कुलगुरु एम. जगदेश कुमार यांची विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापदासाठी आययूएसीचे संचालक अविनाश चंद्र पांडे आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमाळकर यांची नावे देखील चर्चेत होती. परंतु, जगदेशकुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. युजीसीचे अध्यक्ष डी.पी. सिंग यांच्या निवृत्तीमुळे ही जागा रिक्त झाली होती. अभियांत्रिकी क्षेत्रात नाव कमावलेले जगदेश कुमार यांनी जेएनयु विद्यापीठात चांगले काम केले आहे. एम जगदेश कुमार यांची 2016 मध्ये जेएनयुच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली होती. जेएनयुमध्ये जेएनयू स्कूल ऑफ इंजिनिअरिंगची सुरुवात त्यांनी 2018 मध्ये केली. त्यांच्या कार्यकाळात जेएनयुमध्ये अनेक बदल झाले. तसेच गेल्या काही काळात विद्यापीठात घडलेल्या वादग्रस्त घटना त्यांनी कौशल्याने हाताळल्या आहेत. गेल्या 31 जानेवारी रोजी जगदेश कुमार यांचा कुलगुरु पदाचा कार्यकाळ संपला होता.

COMMENTS