नाशिक - केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2024-25 या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञा
नाशिक – केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2024-25 या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी इच्छुकांनी 10 जून 2024 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन वस्त्रोद्योग आयुक्त, नागपूर अविष्यांत पंडा यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे. केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील 2024-25 या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय सत्राकरिता ओडिसा येथील आयआयएचटी बरगढ व वेंकटगिरी येथे प्रवेश सुरू आहेत. या अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्रासाठी ओडिसा येथील आयआयएचटी बरगढ येथे 13 + 1 तसेच वेंकटगिरी येथे 3 (1 जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता) जागांच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर, सोलापूर, मुंबई, औरंगाबाद यांच्यामार्फत 10 जून 2024 पर्यंत विहित नमुन्यात प्रवेश अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांकरिता अधिक माहिती, अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती https://www.dirtexmah.gov.in या संकेतस्थळावर तसेच सर्व प्रादेशिक उपायुक्त, वस्त्रोद्योग यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे, अधिक माहितीसाठी [email protected] या ई मेलवर अथवा 022-23700611 या कार्यालयाच्या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
COMMENTS