Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. ६ : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत सुविधा कर्ज योजना, महिला समृद्धी योजना, शैक्षणिक कर्ज योजना अशा विवि

नैसर्गिक शेतीच्या विस्तार कार्यात बाभळेश्‍वर केंद्राचे कार्य दिशादर्शक
विधानसभा निवडणूका दृष्टीपथात!
निफाड शहरात विविध ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
गुजरात आणि महाराष्ट्र सांस्कृतिक आदान प्रदानाचा उद्या सांगीतिक कार्यक्रम

मुंबई, दि. ६ : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत सुविधा कर्ज योजना, महिला समृद्धी योजना, शैक्षणिक कर्ज योजना अशा विविध योजना राबविल्या जातात. या योजनांकरिता दि. १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन महामंडळाच्या मुंबई शहर-उपनगर जिल्ह्याच्या जिल्हा व्यवस्थापक वैशाली मुडळे यांनी केले आहे.

‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ’ आणि ‘राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त विकास महामंडळा’मार्फत अनुसूचित जातीमधील मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील लोकांच्या आर्थिक उन्नतीसाठी कर्ज योजना राबविण्यात येतात. सुविधा कर्ज योजना – कर्ज मर्यादा रक्कम ५ लाख रुपये, महिला समृद्धी योजना – कर्ज मर्यादा १. ४० लाख व  शैक्षणिक कर्ज योजना कर्ज मर्यादा देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी ३० लाख रुपये व परदेशातील अभ्यासक्रमासाठी ४० लाख रुपये आहे. या कर्ज योजनेंतर्गत लाभार्थीकरिता भौतिक उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.

या कर्ज योजनांचा लाभ घेण्यासाठी दि. १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ मुंबई, गृहनिर्माणभवन, कलानगर, तळमजला, रूम नं ३३, बांद्रा (पू) मुंबई-५१ या पत्त्यावर अर्ज करावे, असे महामंडळाने प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

COMMENTS