Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेकायदेशीर बालगृहे, वसतिगृहे, अनाथाश्रम चालविणार्‍यांची माहिती देण्याचे आवाहन

सातारा / प्रतिनिधी : बेकायदेशीर बालगृहे, वसतिगृहे, अनाथाश्रम चालविणे गंभीर बाब असून अनधिकृत संस्था आढळून आल्यास जिल्ह्यातील जिल्हा महिला व बाल विकास

विद्यार्थ्यांना मारहाण करणार्‍या पोलिसांचे कायम स्वरुपी निलंबन करावे ; इस्लामपूर भाजपा शहर युवामोर्चाची मागणी
इस्लामपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी दालनात राष्ट्रवादीच्या आजी-माजी नगरसेवकांची हमरी-तुमरी
एनसीसीमध्ये मुलींनी प्रवेश घेतल्यास करीयर घडविता येते : कु. आयुषी भांड

सातारा / प्रतिनिधी : बेकायदेशीर बालगृहे, वसतिगृहे, अनाथाश्रम चालविणे गंभीर बाब असून अनधिकृत संस्था आढळून आल्यास जिल्ह्यातील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तसेच चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक 1098 या वर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन पुणे येथील महिला व बाल विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे.
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 आणि सुधारित अधिनियम 2021 मधील कलम 42 नुसार मान्यता तथा सोबतच्या नोंदणी प्रमाणपत्राप्रमाणे नोदणी प्रमाणपत्र प्राप्त नसलेली संस्था अथवा अशी संस्था चालविणार्‍या व्यक्तीला 1 वर्ष कारावास तसेच रुपये 1 लक्ष पेक्षा कमी नसेल एवढा दंड किंवा दोन्हीही करण्यात येईल, असेही आयुक्त गुंडे यांनी कळविले आहे.

COMMENTS