मुंबई: मे.ग्लोबल मीटर मॅन्युफॅक्चरींग कंपनी, पुणे यांनी उत्पादीत केलेल्या ऑटोरिक्षा/टॅक्सी मीटर त्यांना केंद्र शासनाने मंजूर केलेल्या नमुन्यामध्ये (मॉडेल अप्रुव्हल) ग्राहकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने काही फेरबदल केल्याची याचिका मुंबई उच्च न्यायालय येथे दाखल होती. या याचिकेवर दि.३१/०१/२०२५ रोजी सुनावणी होऊन मे. ग्लोबल मीटर मॅन्युफॅक्चरींग कंपनी, पुणे यांनी उत्पादीत केलेल्या ऑटोरिक्षा/टॅक्सी मीटर (Model Approval No.-IND/०९/०६/१६३) ची विक्री व वितरण पुढील आदेशापर्यंत तात्काळ थांबविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत.
उच्च न्यायालयाचे आदेश विचारात घेऊन वैधमापन शास्त्र यंत्रणेकडून सर्व ऑटोरिक्षा/टॅक्सी चालक/मालक यांना मे. ग्लोबल मीटर मॅन्युफॅक्चरींग कंपनी, पुणे यांनी Model Approval No.-IND/०९/०६/१६३ अन्वये उत्पादित केलेल्या मीटरची पुढील आदेशापर्यंत खरेदी करु नये तसेच आपल्या वाहनावर मीटर न बसविण्याची दक्षता घेण्याबाबत आवाहन नियंत्रक वैधमापनशास्त्र मुंबई यांच्याकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात येत आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मे. ग्लोबल मीटर मॅन्युफॅक्चरींग कंपनी, पुणे कंपनीकडून उत्पादित केलेल्या ऑटोरिक्षा, टॅक्सीमीटर ग्राहकांनी उच्च न्यायालयाकडून पुढील आदेश होईपर्यंत खरेदी न करण्याचे आवाहन वैधमापनशास्त्र मुंबई यांनी केले आहे.
COMMENTS