अहमदनगर : सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत असलेल्या पाथर्डी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकिय वसतीगृहामध्ये २०२२-२३ वर्षाकरित
अहमदनगर : सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत असलेल्या पाथर्डी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकिय वसतीगृहामध्ये २०२२-२३ वर्षाकरिता मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश दयावयाचा आहे. त्याकरिता पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत. असे आवाहन वसतिगृहाचे गृहपाल यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. या वसतिगृहात ऊसतोड कामगारांच्या शालेय ३०, कनिष्ठ महाविद्यालय १५, वरिष्ठ महाविद्यालय १५ व व्यावसायिक अभ्यासक्रम १५ अशा एकूण ७५ मुलांना प्रवेश देण्यात येणार आहे. यात प्रवेशासाठी अनुसूचित जाती ८० टक्के, अनुसूचित जमाती ३ टक्के, विजाभज ५ टक्के, ओबीसी ५ टक्के, एसबीसी २ टक्के, दिव्यांनी ३ टक्के व अनाथ २ टक्के असे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. यात प्रवेशित विद्यार्थ्यांना सकाळी नास्ता, दुपारी भरपेट जेवण, संध्याकाळचे जेवण देण्यात येते. वसतिगृहात आवश्यक सोयी-सुविधा आहेत. यामध्ये प्रत्येकी एक कॉट, टेबल, खुर्ची, उशी, उशीचा अभ्रा, चादर, बेडशिट व सतरंजी इ. आंथरून पांघरुन साहित्य, प्रत्येकी महिन्याला उपस्थिती नुसार ५०० रु प्रती महिना निर्वाह भत्ता, प्रत्येकी दोन गणवेशाकरीता प्रतिजोड शालेय ५०० महाविद्यालयाकरीता १००० रूपये, प्रत्येक वर्षाला सहलीकरीता २००० रूपये, प्रत्येक वर्षाला छत्री / गमबुट/ रेनकोट करिता ५०० रूपये, विद्यार्थ्याला आवश्यक स्टेशनरी करिता आवश्यकतेप्रमाणे जास्तीत जास्त ४ हजार रुपये, चोवीस तास संगणकाबरोबर इंटरनेट ची मोफत सुविधा, वाचनालयाची मोफत सुविधा देण्यात येते. या वसतिगृहात वर्षभरातून दोनदा पालक मेळावा घेण्यात येतो. मोफत प्रवेश अर्ज व अधिक माहितीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकिय वसतिगृह, बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या पाठीमागे, कल्याण- विशाखापट्टनम राष्ट्रीय महामार्गालगत, पाथर्डी, जि. अहमदनगर या पत्त्यावर संपर्क साधावा.असे आवाहनही या प्रसिद्धपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
COMMENTS