राष्ट्रीय राजकारणाचे आवाहन आणि वस्तुस्थिती !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

राष्ट्रीय राजकारणाचे आवाहन आणि वस्तुस्थिती !

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या संस्थापक नेत्या ममता बॅनर्जी यांनी देशभरातील विरोधी पक्षांनी भाजपा विरोधात लढण्यासाठी एकत्र येण्

हिश्श्याच्या खुणा करण्यासाठी लाच घेणारी लिपिक कारागृहात
खासदार दाखवा बक्षीस मिळवा | LOKNews24
मुंबईला लुटू देणार नाही ः अदित्य ठाकरे

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या संस्थापक नेत्या ममता बॅनर्जी यांनी देशभरातील विरोधी पक्षांनी भाजपा विरोधात लढण्यासाठी एकत्र येण्याची काळाची गरज असल्याचे आवाहन केले आहे. त्यांनी भाजपेतर पक्षांचे मुख्यमंत्री असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना थेट पत्र लिहून हे आव्हान केले आहे. त्याच वेळी प्रशांत किशोर या निवडणूक स्ट्रॅटेजीस्टने आपल्या एका मुलाखतीत देशाच्या राजकारणावर काही भाष्य केले आहे. या दोन्ही व्यक्तिमत्त्वांच्या वक्तव्य आणि भाष्यावर बोलायचे झाल्यास दोन्ही घटक एकाच सामाजिक प्रवाहातून असल्यामुळे त्यांच्या बोलण्याचा मतितार्थ ही समजून घ्यावा लागेल आणि त्या संदर्भात नेमकी या दोन्हींच्या भूमिका तील स्ट्रॅटेजी काय याचेही आपल्याला अन्वेषण करावे लागेल. पश्चिम बंगाल मध्ये काही काळापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने सर्व हातखंडे वापरून देखील आणि नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता पूर्णपणे पणाला लावून देखील त्यांना पश्चिम बंगाल मध्ये हार पत्करावी लागली हे वास्तव निश्चितच भाजपची आहे आणि मोदी – शहा यांच्या जिव्हारी लागलेले आहे. परंतु ममता बॅनर्जी यांचा विजय हा अनेक राजकीय समीकरणांची गोळाबेरीज आणि पडद्यामागील राजकारणाचा एक विशेष भाग म्हणून देशात चर्चिला गेला आहे. काहींच्या मते कम्युनिस्टांनी काही प्रमाणात भाजपाकडे आपला झुकाव केला तर काहींच्या मते संघाने आतून ममता बॅनर्जी यांना साथ दिली अशा वेगवेगळ्या पध्दतीने पश्चिम बंगालच्या विजयाची समीक्षेने झाली. तरीही ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या विरोधात देशातील भाजपेतर पक्षांना एकत्रित येण्याचे केलेले आव्हान, हे नव्या राजकीय समीकरणांना सन २०२४ पर्यंत आकार देईल, अशी दाट शक्यता आहे. तर दुसर्‍या बाजूला निवडणूक स्ट्रॅटेजीस्ट प्रशांत किशोर यांनी आगामी काळातील निवडणूक धोरणांची चर्चा करताना केवळ भाजप काँग्रेस आणि आप या तीन पक्षांना आगामी काळात राष्ट्रीय राजकारणात कसा आहे, या संदर्भातच फक्त आपली पुष्टी जोडलेली आहे. त्यांच्या मते संपूर्ण भारतात उभे असणारे राष्ट्रीय पक्ष आणि तांत्रिक दृष्ट्या राष्ट्रीय पक्ष होणे या दोन भिन्न बाबी आहेत. यापूर्वी काँग्रेस हा एकमेव पक्ष संपूर्ण भारतात आपली पाळेमुळे होऊन आहे त्यानंतर भारतीय जनता पक्षाला ही संधी मिळाली आहे. याव्यतिरिक्त काही पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून नावारूपाला येतात. परंतु, त्यांचा आवाका हा २ – ३ राज्यांच्या पलीकडे जात नाही; किंबहुना एकच राज्य बेस म्हणून ते सांभाळून ठेवतात आणि इतर राज्यांमध्ये त्यांची मतांची काही टक्केवारी किंवा तुरळकपणे काही लोकप्रतिनिधी निवडून येतात, त्या तांत्रिक कारणास्तव ते पक्ष राष्ट्रीय होत असले तरी खऱ्या अर्थाने पॅन इंडिया किंवा संपूर्ण भारतभर पसरलेले पक्ष नसतात, हे त्यातील वास्तव आहे. कम्युनिस्ट पक्ष,  जनता दल, बहुजन समाज पार्टी, समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल आदी अशा प्रकारचे पक्ष हे राष्ट्रीय पक्ष जरूर झाले, परंतु संपूर्ण भारतभरात त्यांची मतदार शक्ती त्या पद्धतीने नाही, किंवा तेवढ्या प्रमाणात नाही, हे वास्तव प्रशांत किशोर अधोरेखित करतात. संपूर्ण भारतात ताकद निर्माण करून राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी आणि त्याहीपेक्षा सत्तेत येण्यासाठी किमान वीस कोटी मतदान खेचणे आवश्यक असल्याची निवडणूक स्ट्रॅटेजी ते सांगतात आणि ही बाब देशात फक्त दोनच पक्षांना शक्य झाल्याचे ते नमूद करतात ते म्हणजे काँग्रेस आणि आता भाजप. ममता बॅनर्जी यांनी केलेल्या आवाहनानुसार आणि प्रशांत किशोर यांनी वस्तुनिष्ठ दृष्टिकोन ठेवून सांगितलेल्या वास्तवानुसार जर आपण विचार केला, तर आगामी काळात संपूर्ण देशात प्रत्येक राज्यात एक स्थानिक किंवा प्रादेशिक पक्ष निर्माण झाला आहे, जो बहुदा त्या राज्यातील राजकीय सत्ता आपल्या हातात ठेवतो; अशा पक्षांना सोबत घेऊन राष्ट्रीय आघाडी निर्माण करून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षा समोर आव्हान उभे करण्याची ताकद जर विरोधी पक्षांना निर्माण करायची असेल, तर त्यांना अखिल भारतीय पातळीवर असणारा काँग्रेस पक्ष दुर्लक्षित करता येणार नाही, हे देखील तेवढेच वास्तव आहे. दिल्ली आणि नुकताच पंजाब ची राजकीय सत्ता आपल्या हाती  घेणारा आम आदमी पक्ष हा तांत्रिकदृष्ट्या येणाऱ्या काही दिवसात कदाचित राष्ट्रीय पक्ष म्हणून पुढे येईल; परंतु, संपूर्ण भारतभर पसरलेला पक्ष म्हणून जर या पक्षाला उभे राहायचे असेल तर किमान वीस वर्ष रात्रंदिवस त्यांना काम करावे लागेल, असे भाकीतही प्रशांत किशोर यांनी केलेले आहे. परंतु कोणताही पक्ष सहज म्हणून वाढत नाही, तर त्यासाठी कार्यकर्त्यांची फळी आणि केडरायझेशन हे प्रत्यक्षात मैदानात उतरावे लागते. त्याशिवाय कोणताही राजकीय पक्ष जनमानसाची किंवा मतदारांची पकड घेत नाही. मतदारांची पकड न घेतल्यामुळे संपूर्ण भारतभरात राष्ट्रीय पक्ष म्हणून उभे राहू शकत नाही, हे देखील तेवढेच वास्तव आहे.

COMMENTS