Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईमध्ये प्रदुषणविरोधी मोहिमेला जोर

नऊ दिवसांत 8 हजार 445 वाहनांवर कारवाई

मुंबई: मुंबईतील वाढत्या प्रदुषणामुळे मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेनेही उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे. त्याअंतर्गत वाहतूक पोलिसांनी गेल्या 9

 पोलिस मित्र मदत केंद्र महाराष्ट्र राज्य संघटनेच्या अहमदगर जिल्हा अध्यक्षपदी ज्ञानेशवर येवले
Kolhapur : चंदगड तालुक्यातील उमगाव भागात टस्कर हत्तीचा धुमाकूळ (Video)
उपमुख्यमंत्री अजित दादा बीड जिल्हा तुमच्या पाठीशी आहे-बजरंग बप्पा सोनवणे

मुंबई: मुंबईतील वाढत्या प्रदुषणामुळे मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेनेही उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे. त्याअंतर्गत वाहतूक पोलिसांनी गेल्या 9 दिवसांत वायू प्रदुषणाच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी 8,445 कारवाया केल्या आहेत. या विशेष मोहिमेअंतर्गत अनधिकृत सायलन्सरची निर्मिती करणार्‍यांवरही कारवाई करणार असल्याची माहिती सहपोलीस आयुक्त (वाहतूक) प्रवीण पडवळ यांनी दिली.

वाहतूक पोलीस पीयूसी प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांविरोधात 7 नोव्हेंबरपासून कारवाईला सुरूवात केली आहे. तसेच राडारोड्याची वाहतूक करताना नियमभंग करून धूळ उडवणार्‍या वाहनांवरही कारवाई करणास सांगण्यात आले होते. जुन्या व्यावसायिक वाहनांना सीएनजी किट बनवणे बंधनकारक असतानाही अनेक वाहनचालक तसे करणे टाळतात. अशा वाहनावरही दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच दुचाकी, मोटरगाडीचा सायलन्सर कापलेल्या वाहनांवरही कारवाई करण्याचे आदेश सर्व चौक्यांना देण्यात आले होते. या आदेशानंतर वाहतूक पोलिसांनी वायू प्रदुषणाबाबतच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी 8,445 कारवाया केल्या आहेत. त्यात पीयूसी प्रमाणपत्र नसल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी 5,866 कारवाया केल्या आहेत. वाहनांच्या सायलेन्सरमध्ये अनधिकृत बदल केल्याप्रकरणी 841 वाहनांवर कारवाई करण्यात आली. यावेळी 584 सायलेन्सर वाहतूक पोलिासंनी जप्त केले. त्यांच्यावर बुलडोझर चालवण्यात आले आहेत. राडारोडा अथवा मालाची धोकादायक वाहतूक केल्याप्रकरणी 1,738 वाहनांवर कारवाई करण्यात आली. या संपूर्ण मोहिमेअंतर्गत 13 लाख 75 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. अनधिकृत सायलन्सर वायू व ध्वनी प्रदुषणाला कारणीभूत ठरतात. त्यामुळे अशा सायलन्सरची निर्मिती करणार्‍यांविरोधातही पोलीस कारवाई करणार आहेत. गेल्या 9 दिवसांपासून वाहतूक पोलिसांनी वायू प्रदुषणाच्या नियमांचा भंग करणार्‍या वाहनांवर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. त्याअंतर्गत 9 नोव्हेंबरला वाहतूक पोलिसांनी सर्वाधिक कारवाया केल्या. गुरूवारी पीयूसी नसलेल्या 1,028 वाहनांवर कारवाई करण्यात आली. वर्षभरात पीयूसीबाबत 20 हजार 946 कारवाया वाहतूक पोलिसांनी केल्या आहेत. तसेच अनधिकृत सायलेन्सरबाबत 216 कारवाया एका दिवसात करण्यात आल्या. याशिवाय राडारोड व मालाची असुरक्षीतरित्या वाहतूक केल्याप्रकरणी 331 वाहनांवर कारवाई करण्यात आली.

COMMENTS