Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्रातही ’लव्ह जिहाद’ विरोधी कायदा हवा – चित्रा वाघ

नागपूर प्रतिनिधी : उत्तरप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही लव्ह जिहाद विरोधी कायदा हवा अशी मागणी भाजपा महिला आघाडी अध्यक्षा चित्रा वाघ(Chitra Vag

राज्याचे गृहमंत्री सजग अन् सक्षम : चित्रा वाघ
चॅनलमधील पत्रकार मुली साडी का नाही नेसत ? – सुप्रिया सुळे
असले पत्रकार सुपारी घेऊन प्रश्न विचारतात…

नागपूर प्रतिनिधी : उत्तरप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही लव्ह जिहाद विरोधी कायदा हवा अशी मागणी भाजपा महिला आघाडी अध्यक्षा चित्रा वाघ(Chitra Vagh) यांनी नागपुरात आयोजित पत्रपरिषदेत केली. यावेळी वाघ म्हणाल्या की, उत्तर प्रदेशातील लव्ह जिहाद विरोधी कायद्यानुसार मुस्लिम व्यक्तीने हिंदू तरुणीशी विवाह करून तिचे धर्मांतर केल्यास 5 वर्षांचा कारावास आणि 15 हजार रुपये दंडांच्या शिक्षेची तरतूद आहे. तर मुलगी अनुसूचित जाती, जमातीची वा आदिवासी आणि अल्पवयीन असल्यास किमान 2 ते 7 वर्षे कारावास आणि 25 हजार रुपये दंडाची तरतुद आहे. जबरदस्तीने आंतरधर्मीय लग्न लावले जातात त्यांच्यासाठी लव्ह जिहाद कायदा राज्यात होणे आवश्यक असल्याचे वाघ यांनी सांगितले. वसईतील श्रद्धा वालकर तरूणीची तिचा लिव्ह इन पार्टनर आफताब अमीन पुनावाला याच्याशी एका ऑनलाईन डेटिंग अ‍ॅपवरून ओळख झाली होती. यावर विश्‍वास ठेवणे चुकीचे आहे. अशा नराधमाला फाशीच दिली पाहिजे असे वाघ म्हणाल्या. अंगावर काटा आणणारी ही घटना आहे. प्रेम करणार्‍या मुलीचा विश्‍वास घात केला आहे, असे वाघ म्हणाल्या. गेल्या अडीच वर्षात आम्ही अनेकदा आंदोलने केली. परंतु, महाविकास आघाडी सरकारने आमचे त्यावेळी एकले नाही. मात्र आता आमचे सरकार आहे. महिलांवर अत्याचार करणार्‍यांना कठोर शिक्षा केली जाईल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही तत्काळ दखल घेत कारवाई करतात. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्षात काय केले हे कोणी सांगावे असा सवाल वाघ यांनी केला. नंदुरबार येथील घटनेत देवेंद्र फडणवीस यांनी अधिकार्‍यांना निलंबित केले. भंडारा येथील घटनेतही कारवाई केली. शिंदे, फडणवीस सरकारच्या काळात महिलांकडे कोणी वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. प्रत्येक बुथवर येत्या काळात पंचवीस महिला कार्यकर्त्या पाहायला मिळतील. 200 प्लस जागा जिंकण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमच्या अस्मितेवर कोणी घाला घालत असेल तर खपवून घेणार नाही. संजय राठोड यांच्या विरोधात माझी लढाई मी लढत आहे. त्यांच्या राजीनाम्यावर मी ठाम आहे. प्रत्येक जिल्ह्यात मला संजय राठोड यांच्याबद्दल प्रश्‍न विचारले जातात. पण, माझी न्यायालयीन लढाई सुरू आहे. पीडिता माझ्या जातीची नव्हती की माझ्या रक्ताची नव्हती. तरीही मी लढले. संजय राठोड माझा कोणी लागत नाही, असे वाघ यांनी स्पष्ट केले.

COMMENTS