लोकप्रियतेचा दुसरा अर्थ

Homeताज्या बातम्यासंपादकीय

लोकप्रियतेचा दुसरा अर्थ

लोकप्रियता या शब्दांचा किस पाडण्याचे इथे प्रयोजन नसले तरी, जगभरातील लोकप्रिय नेत्यांच्या जागतिक मानांकनात भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अव्वल ठरल

खडसेंची राजकीय गोची
हकनाक बळी !
वाढते दहशतवादी हल्ले चिंताजनक

लोकप्रियता या शब्दांचा किस पाडण्याचे इथे प्रयोजन नसले तरी, जगभरातील लोकप्रिय नेत्यांच्या जागतिक मानांकनात भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अव्वल ठरले आहेत. त्यामुळे लोकप्रियता हा शब्द पुन्हा एकदा जनमानसा समोर आला आहे. जगभरात नरेंद्र मोदी यांचा डंका वाजत असल्याचा अविभार्वात भक्तमंडळी वावरत असतांना, ही लोकप्रियता नेमकी काय असते, कुठून येते, आणि कोण लोकप्रिय करते, याचा उहापोह करणे गरजेचे आहे.
भारतात अंधभक्तांची कमी नाही. अंधभक्त हा शब्द जर अल्लड वाटत असला, तरी यामागे लपली आहे विभूतीपुजा. भारतीय संविधान देशाला प्रदान करतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, या देशात विभूतीपुजा मोठया प्रमाणावर आहे. महात्मा असो की नेता, त्याच्यावर अंधविश्‍वास ठेऊन, त्याचे कार्यकर्ते म्हणा किंवा सामान्य जनता त्यांना डोक्यावर घेऊन नाचते. मात्र भारतासारख्या लोकशाहीप्रदान देशात राजकीय नेत्यांचे मूल्यमापन करण्याचे, चिकित्सा करण्याची खरी गरज आहे. त्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने सजग राहून देशाच्या कारभाराची आणि राजकीय नेत्यांची चिकित्सा करायला हवी. आणि या लोकप्रतिनिधीवर अंकुश ठेवायला हवा. पण तसं आपल्याकडे घडत नाही. याचे कारण म्हणजे आपल्याला लोकशाहीसाठी संघर्ष करावा लागलेला नाही. किंबहूना स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर देखील आपण लोकशाही येथील प्रत्येक नागरिकांत रुजवण्यासाठी आपण लढा, मोहीम, अभियान आंदोलन उभारू शकलेलो नाही. लोकशाही ही आपल्याला फुकट मिळालेली देणगी आहे. त्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागलेला नाही, की रक्त सांडावे लागलेले नाही. स्वातंत्र्यासाठी आपण संघर्ष केला, रक्त सांडले मात्र लोकशाहीसाठी नाही. त्यामुळे लोकशाहीच्या संरक्षणासाठी देशातील प्रत्येक नागरिक सजग नाही. त्याच्यावर पाहिजे ते विचार बिंबवले जातात, आणि तो त्याप्रकारे व्यक्त होतो. देशाची अर्थव्यवस्था, गरीबीत वाढ, रोजगारीत वाढ, आरोग्याच्या सोयी-सुविधा मिळत नाही, अशा अनेक तक्रारीची जंत्री वाढतच जाईल. म्हणजेच आपण आपल्या न्याय हक्कांसाठी, अधिकारासाठी आजही सजग नाही. त्यातून राजकीय नेत्यांच्या वाढणारी संपत्ती, आणि त्यांची लोकप्रियता कमी होत नाही.
पंतप्रधान मोदींची लोकप्रियता वाढली म्हणजे, देशातील सर्व प्रश्‍न त्यांनी सोडविले, ते कुणी मसीहा आहेत, असे काही होत नाही. मग ही लोकप्रियता कुठे आहे, आणि कोण ठरवतो, हा संशोधनांचा विषय आहे. त्याचे निकष काय आहेत, याची देखील चिकित्सा करण्याची गरज आहे. वास्तविक पाहता भाजपला सर्व शक्ती पणाला लावून विविध राज्यांवर आपली सत्ता प्रस्थापित करायची आहे. त्यांचा हा अंजेडा लपून राहिलेला नाही. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रधानमंत्री मोदींची प्रतिमा मोठी करायची, आणि आपला देश त्यांच्या हाती सुरक्षित असल्याच्या बाता करून, पुन्हा एकदा सर्वसामान्यांचे लक्ष नागरी प्रश्‍नांवरून भरकटवण्याचा हा खेळ आहे. तर प्रधानमंत्री मोदी यांच्या सकारात्मक बाजू म्हणजे, भाजपसाख्या देशातल्या एका श्रीमंत आणि शिस्तबद्ध, काटेकोर नियोजनाने चालणार्‍या राजकीय पक्षाचे पाठबळ त्यांच्याकडे आहे. आणि त्याच्या जीवावर लागोपाठ दोन निवडणुका त्यांनी जिंकल्या. अंगभूत राजकीय धूर्तपणाचा वापर करत, लोकांना बनावट हिंदू राष्ट्रवादाची साद घालत त्यांनी मतदारांना भुलवले आणि विरोधकांना नेस्तनाबूत केले आहे. यात नशिबानेही त्यांना साथ दिली. त्यांच्या समर्थकांनी 2016 मध्ये मोदी सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या चुकीच्या निर्णयाकडे कानाडोळा केला. कोरोनाच्या आरोग्यसंकटानंतर देशाची अर्थव्यवस्था ढासळलेली आहे. पण, तरीही समर्थकांचा पाठिंबा कमी झालेला नाही. अर्थात, याचे आणखी एक कारण देशात सक्षम विरोधी पक्षाचा अभाव हे ही आहे. त्यांचे अपयश अजूनही जनतेपर्यंत पोहचवण्यात विरोधक कमी पडतांना दिसून येत आहे.

COMMENTS