पुणे : गेल्या महिन्याभरापासून राज्यात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला असून पाण्याअभावी पिके करपून चालली आहे. ग्रामीण भागासह
पुणे : गेल्या महिन्याभरापासून राज्यात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला असून पाण्याअभावी पिके करपून चालली आहे. ग्रामीण भागासह शहरात देखील अद्याप समाधानकारक पाऊस नाही नाही. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. पुणे, मुंबई आणि नाशिक जिल्ह्यातील अनेक धरणे अद्यापही पूर्ण क्षमतेने भरलेली नाही.
पहिल्याच पावसात पुण्यातील खडकवासला, पानशेत आणि मुळा-मुठा धरणात समाधानकारक पाणीसाठा जमा झाला होता. मात्र, आता पावसाने महिनाभरापासून दडी मारल्याने धरणातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. हीच बाब लक्षात घेता, पुण्यात पुन्हा एकदा पाणीकपात लागू होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज शनिवारी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तातडीने बैठक बोलावली आहे. या बैठकीत पाणीकपातीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार की नाही, याबद्दल अजून स्पष्टता आलेली नाही. पुणे शहर व परिसराला पाणीपुरवठा करणार्या खडकवासला, पानशेत आणि मुळा-मुठा या धरणांमध्ये सध्या 27.60 अब्ज घनफूट इतका पाणीसाठा आहे. मात्र, पावसाने पाठ फिरवल्याने हा पाणीसाठी झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे पावसाळा संपेपर्यंत पाण्याचं नियोजन कसं करायचं?, यावरही सखोल चर्चा केली जाणार आहे. पुणे शहराला दरवर्षी 18.5 टीएमसी इतक्या पाणीसाठ्याची आवश्यकता असते. यंदा पावसाने दडी मारल्याने पाणीपुरवठा करणार्या धरणांमध्ये पाण्याची चांगली आवक झालेली नाही. त्यामुळे पुणेकरांना कमीत कमी पाण्यात गरज भागवावी लागणार आहे. दरम्यान, पुण्यात पुन्हा एकदा दर गुरुवारी पाणीपुरवठा कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
COMMENTS