नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नामिबिया आणि दक्षित आफ्रिकेतून येथून मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात 20 चित्ते आणले होते. त्याप

नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नामिबिया आणि दक्षित आफ्रिकेतून येथून मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात 20 चित्ते आणले होते. त्यापैकी बुधवारी एका मादी चित्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत मृत चित्यांची संख्या 6 झाली आहे. मादी चित्यापैकी एक ‘धात्री’ चित्ता मृतावस्थेत आढळली. या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून शवविच्छेदन केले जाणार आहे, असेही अधिकार्याने सांगितले. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात नामिबिया आणि दक्षित आफ्रिकेतून 20 प्रौढ चिते कुनो अभयारण्यात आणण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी चार पिल्लांना जन्म दिला. त्यापैकी आता 6 चित्यांचा मृत्यू झाला आहे.
COMMENTS