Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पन्हाळ्यावर सापडला आणखी एक तोफगोळा

कोल्हापूर : गडाच्या पश्‍चिम बाजूच्या पुसाटी बुरुज परिसरातील स्वच्छता करताना तटबंदीत घुसलेला आणखी एक तोफगोळा राजा शिवछत्रपती परिवाराच्या कार्यकर्त

राजारामबापू सहकारी बँकेस 36.48 कोटींचा नफा : शामराव पाटील
तरडगाव येथे मातेकडून चिमुकल्याचा खून
शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू; रांगणा किल्यावरील घटना; मृत तरुण पणूंब्रे-वारुण येथील

कोल्हापूर : गडाच्या पश्‍चिम बाजूच्या पुसाटी बुरुज परिसरातील स्वच्छता करताना तटबंदीत घुसलेला आणखी एक तोफगोळा राजा शिवछत्रपती परिवाराच्या कार्यकर्त्यांना सापडला. 1 किलो 735 ग्रॅम वजनाचा हा धातूचा तोफगोळा परिवाराच्या कार्यकर्त्यांनी पुरातत्त्व विभागाकडे दिला. राजा शिवछत्रपती परिवार ही संस्था प्रत्येक महिन्याच्या एका रविवारी किल्ले पन्हाळगड तसेच रांगणा किल्ल्याची स्वच्छता आणि संवर्धन करतात.
आज सकाळी साडेसात वाजता विविध गावांतील परिवाराचे 151 युवक 47 व्या मोहिमेसाठी बाजीप्रभू चौकात जमा झाले आणि संघप्रमुख उमेश तथा नाना डाकवे यांच्या नेतृत्वाखाली राजदिंडी ते पुसाटी बुरुज परिसरातील तटबंदीच्या स्वच्छतेला लागले. सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांना पुसाटी बुरूज परिसरात दगडात घुसलेला तोफगोळा आढळून आला. तो अलगदपणे काढून त्याची त्यांनी स्वच्छता केली. मसाई पठाराच्या बाजूने हा तोफगोळा डागल्याची शक्यता आहे. जागोजागी थोडीफार छिद्रे पडलेला हा लोखंडी तोफगोळा 1 किलो 735 ग्रॅम वजनाचा आहे. डाकवे, विजय पाटील, विजय जगदाळे, मोहन कोकणे यांनी येथील पुरातत्त्व विभागाच्या कर्मचार्‍यांकडे तो दिला. पर्णाल दुर्ग इतिहास संशोधक मंडळाचे प्रमुख संभाजी शेवाळे यांनी पन्हाळगडाविषयी माहिती दिली.
संशोधन होणे गरजेचे
गतवर्षी पावनगडावर फलक लावताना दगडी तोफगोळ्यांचा साठा सापडला होता. तसेच गेल्या आठवड्यात टोप, कासारवाडी येथील दुर्ग सेवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना तीन दरवाजा परिसरातील तटबंदीची स्वच्छता करताना अडीच किलो वजनाचा फुटलेला तोफगोळा तटबंदीत सापडला होता. गडाच्या पूर्व आणि पश्‍चिम भागात असे तोफगोळे सापडत असल्याने त्याविषयी संशोधन होणे गरजेचे आहे.

COMMENTS