Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अण्णासाहेब कडलग यांचे निधन

अकोले ः अकोले तालुक्यातील कोतुळ येथील रहिवासी अण्णासाहेब रघुनाथ कडलग यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 62 वर्षाचे होते. हृदयविका

अकोले व राजूर न्यायालयात उद्या लोकअदालत
बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा : सतीश पाटील
विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेस सामोरे जावे ;- आमदार मोनिका राजळे 

अकोले ः अकोले तालुक्यातील कोतुळ येथील रहिवासी अण्णासाहेब रघुनाथ कडलग यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 62 वर्षाचे होते. हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर कोतुळ येथे मुळा तीरी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. कोतूळ येथील  शासनमान्य स्वस्त धान्य दुकानात ते सेवा करत होते. त्यांच्या निधनाने परिसरात हळ हळ व्यक्त केली जात आहे.

COMMENTS