Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अण्णासाहेब चिरमुले पुरस्कार नाम फौंडेशन यांना जाहीर

सातारा / प्रतिनिधी : युनायटेड वेस्टर्न बँकेने बँकेचे संस्थापक कै. वा. ग. चिरमुले यांचे स्मरणार्थ स्थापन केलेल्या वा. ग. तथा अण्णासाहेब चिरमुले चॅरिटे

इस्लामपूर शहरातील ट्रॉफीक सिग्नलचे काम सुरु; अनेक दशकाचा प्रलंबीत प्रश्‍न मार्गी : निशिकांत भोसले-पाटील
सातारा एसटी कर्मचार्‍यांचे सातार्‍यात आंदोलन; प्रवाशांची बसस्थानकात गर्दी
राष्ट्रवादीचे माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात आज प्रवेश

सातारा / प्रतिनिधी : युनायटेड वेस्टर्न बँकेने बँकेचे संस्थापक कै. वा. ग. चिरमुले यांचे स्मरणार्थ स्थापन केलेल्या वा. ग. तथा अण्णासाहेब चिरमुले चॅरिटेबल ट्रस्ट’ तर्फे दरवर्षी विविध क्षेत्रात अमूल्य सेवा देणार्‍या व्यक्तींचा सन्मान केला जातो. सन्मानचिन्ह व एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या वर्षी ट्रस्टने नाम फाउंडेशन या संस्थेस हा पुरस्कार देण्याचे ठरविले आहे. नाम फाउंडेशन ही नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे या मराठी सिनेअभिनेत्यांनी सामाजिक जाणिवेतून सुरू केलेली संस्था आहे. ही संस्था महाराष्ट्रातील दुष्काळी भागांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना मदत व त्यांना पुनः उभे राहाण्यास करते. मदतीचे स्वरूप फक्त आर्थिक मदत न रहाता, शेतकर्‍यांना व त्यांच्या कुटुंबीयांना काही पर्यायी उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे. त्यांच्या 10 वर्षाच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल सन 2024 चा ‘आण्णासाहेब चिरमुले पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम लवकरच आयोजित केला जाईल, अशी माहिती ट्रस्टचे विश्‍वस्त दिलीप पाठक, डॉ. अनिल पाटील, डॉ. अच्युत गोडबोले, समीर जोशी यांनी दिली.

COMMENTS