सोलापूर : विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही तास उरले असतांनाच, खासदार शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मतदारसंघातून ऐनवेळी आपला उमेदवार बदल
सोलापूर : विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही तास उरले असतांनाच, खासदार शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मतदारसंघातून ऐनवेळी आपला उमेदवार बदलला आहे. अण्णांच्या पुण्याईमुळे राजू खरे यांना मोहोळ मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँगे्रसने मोहोळ विधानसभा मतदारसंघातून रमेश कदम यांची कन्या सिद्धी हिला तिकीट देण्यात आले होते. मात्र स्थानिकांतून होणारा विरोध लक्षात घेता खा. शरद पवार यांनी ऐन मोक्याच्या क्षणी राजू खरे यांना तिकीट देण्यात आले आहे. यामुळे आत अजित पवार गटाचे विद्यमान आमदार माने यांना राजू खरे यांच्यात लढत होणार आहे. दरम्यान सिद्धी कदम यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांसह अनेक जण नाराज झाले होते. त्यानंतर काल मोहोळ मधील इच्छुक उमेदवारांनी शरद पवारांची भेट घेऊन उमेदवार बदलण्याची मागणी केली होती. त्यांनी 2019 च्या विधानसभेदरम्यान रमेश कदम जेलमध्ये असताना कन्या सिद्धी कदम यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती. रमेश कदम हे जामिनावर बाहेर आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी सिद्धी रमेश कदम यांना अनवधानाने ए बी फॉर्म दिला गेलेला आहे, तो रद्द करण्यात यावा, पक्षाचे अधिकृत उमेदवार राजू ज्ञानू खरे हे आहेत, असे पत्र मोहोळ विधानसभा निवडणूक निर्णय अधिकार्यांना दिलेले आहे. मोहोळमधील उद्योजक असलेले राजू खरे यांनी युवा सेनेच्या माध्यमातून राजकारणाची सुरूवात केली. त्यांनी युवा सेनेतून मागील काही वर्षांपासून ते मतदारसंघात सामाजिक कार्याच्या माध्यमातून सक्रीय आहेत. महिनाभरापूर्वीच त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने त्यांच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या. अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील 312 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार रमेश कदम यांना अटक करण्यात आली होती. ऑगस्ट 2023 साली ते तुरुंगातून बाहेर आले. मात्र त्यांच्यावर असलेल्या आरोपामुळे त्यांच्या कन्येला खासदार शरद पवारांनी उमेदवारी दिली होती. मात्र ऐनवेळी पवारांनी कार्यकर्त्यांची नाराजी लक्षात घेवून राजू खरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
कोण आहेत राजू खरे?
युवा सेनेपासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणारे राजू खरे हे नंतर उद्योगानिमित्त मुंबईत गेले आणि तेथेच स्थायिक झाले. गेल्या वेळी विधानसभेला त्यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मागितली होती मात्र त्यावेळेला त्यांना डावलण्यात आल्याने त्यांनी धीर न सोडता याच मतदारसंघात रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण अशा क्षेत्रात काम करत राहिले. दुष्काळा दरम्यान खरे यांनी मोहोळ शहर मोहोळ ग्रामीण आणि उत्तर सोलापूर या भागात स्वखर्चाने पाणी टँकर सुरू केले होते. याच सोबत मागील त्याला रस्ता मागील त्याला बोरवेल अशा रीतीने लोकांशी संपर्क वाढवत त्यांनी विधानसभेसाठी पेरणी सुरू केली होती. दरम्यानच्या काळात खरे यांनी अनेक शाळांना मदत करताना विविध कंपन्याचे सीएसआर फंड दिले होते.
COMMENTS