Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अण्णा भाऊंचे साहित्य म्हणजे मराठी भाषेचे वैभव

माजी आमदार मुरकुटे यांचे प्रतिपादन

श्रीरामपूर ः लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ दीड दिवस शाळेत गेले, परंतु त्यांची वैचारिक उंची ही शिक्षणापलीकडची होती. याच बुद्धिमत्तेच्या जोरावर त्

प्रथमेश शिंदेना विश्‍वरत्न पुरस्कार 2024 जाहीर
अण्णासाहेब कडलग यांचे निधन
आद्यपुरुष एकलव्यांच्या स्मारकासाठी निधी द्या

श्रीरामपूर ः लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ दीड दिवस शाळेत गेले, परंतु त्यांची वैचारिक उंची ही शिक्षणापलीकडची होती. याच बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी साहित्य क्षेत्रात जागतिक पातळीवर स्थान मिळवले. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी शाहिर अमर शेख यांच्या जोडीने लोकजागृतीचे मोठे कार्य केले आहे. अण्णाभाऊ यांच्या साहित्याचा अभ्यासकांनी अभ्यास करुन त्यांचे समाज प्रबोधनाचे कार्य पुढे नेणे हेच त्यांचे खरे स्मरण ठरेल, असे प्रतिपादन अशोक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले.
          लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मृतिदिना निमित्त माजी आमदार भानुदास मुरकुटे, अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, हेमंत ओगले आदी मान्यवरांनी अण्णाभाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. मुरकुटे पुढे म्हणाले की, अण्णाभाऊंना जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. पण ते खचले नाहीत. त्यांनी आपल्या लेखणीतून साहित्य क्षेत्रात प्रचंड कामगिरी केली. त्यांनी कादंबर्‍या, कथासंग्रह, पोवाडे, पटकथा, लावणी यांची निर्मिती केली. त्यांची ‘मुंबईची लावणी’ व ‘माझी मैना गावावर राहिली’ या लावण्या अविस्मरणीय आहेत. तसेच रशियात जाऊन छत्रपती शिवरायांचा पोवाडा गाणारे ते प्रथम लोकशाहीर होते. ‘जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मज भीमराव’ हे डॉ. आंबेडकरांवरील गीत खूप गाजले. त्यांच्या ‘फकीरा’ या कादंबरीला राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला, असे ते म्हणाले. यावेळी अशोक बँकेचे चेअरमन ड्.सुभाष चौधरी, व्हा.चेअरमन भाऊसाहेब हळनोर, लोकसेवा विकास आघाडीचे शहर अध्यक्ष नाना पाटील, विजय शेलार, अशोकराव जगधने, मुरलीधर राऊत, रोहन डावखर, युवराज फंड, सुरेश ढोबळे, निलेश नागले, गणेश काटे, दीपक भांड, सुनील साबळे, रितेश एडके, गणेश भाकरे, अमोल कोलते, प्रमोद करंडे, बाळासाहेब शिंदे, सतिष दळे, पंकज देवकर आदी उपस्थित होते.

COMMENTS